भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारची क्रेझ वाढत आहे. ७-१२ लाख रुपयांच्या श्रेणीतील कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. जवळजवळ हॅचबॅकच्या किमतीत येणाऱ्या, या कार केवळ चांगली जागा आणि वैशिष्ट्ये देत नाहीत, तर मायलेजही चांगला देतात. आजकाल, टाटाची एक स्वस्त SUV बाजारात मोठी कामगिरी करत आहे. बजेट सेगमेंटमध्ये विकली जाणारी ही एसयूव्ही लोकांना खूप आवडते. जानेवारी २०२४ मध्ये, ही टाटा मिनी एसयूव्ही १७ हजार ९७८ युनिट्सच्या विक्रीसह देशात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही होती. या कारच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. अलीकडेच कंपनीने ते सीएनजी आणि सनरूफसह लाँच केले आहे. ही कार ५ स्टार ग्लोबल NCAP क्रॅश सेफ्टी रेटिंगसह देखील येते.
येथे आम्ही टाटा पंच बद्दल बोलत आहोत जी मिनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. पंचची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.५२ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. आकाराने कॉम्पॅक्ट असूनही, पंचमध्ये ५ लोक बसू शकतील एवढी जागा आहे. या कारमध्ये ३६६ लीटरची बूट स्पेस आहे.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पंचमध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. टाटा पंचला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ५-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, बजाजची पल्सर नव्या अवतारात देशात दाखल, जाणून घ्या किंमत…)
कंपनी टाटा पंचमध्ये १.२ लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरत आहे. हे इंजिन ८८ bhp ची कमाल पॉवर आणि ११५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच ५-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. टाटा पंच पेट्रोलमध्ये २०.०९kmpl आणि CNG मध्ये २६.९९km/kg मायलेज देते.
EMI किती असेल?
तुम्ही टाटा पंचचे बेस मॉडेल प्युअर (पेट्रोल) खरेदी केल्यास, त्याची एक्स-शोरूम किंमत ६ लाख १२ हजार ९०० रुपये आहे. हे मॉडेल ६ लाख ९१ हजार ११४ रुपयांच्या ऑन-रोड किमतीत मिळेल. यासाठी तुम्ही २ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला ४ लाख ९१ हजार ११४ रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही बँकेकडून ९.८ टक्के दराने ५ वर्षांसाठी कार लोन घेत असाल तर तुम्हाला दरमहा १० हजार ३८६ रुपये EMI भरावे लागेल. तुम्ही कर्जाच्या कालावधीत १ लाख ३२ हजार ०४६ व्याज द्याल. टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन तुम्ही पंचच्या फायनान्स ऑफरबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.