Hyundai Motors ने गेल्या महिन्यात (जुलै २०२३) भारतात आपली नवीन subcompact SUV लॉन्च केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होत असून एक्स-शोरूम १० लाखांपर्यंत जाते. या मायक्रो एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या कारला ५०,००० पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV असेल.

एक लाख रुपये डाऊनपेमेंट करुन ‘ही’ कार आणा घरी

Hyundai Exter ही एसयुव्ही कंपनीने  EX, S, SX, SX (O) आणि SX (O) कनेक्ट ट्रिमच्या एकूण १७ प्रकारांमध्ये सादर केली आहे. ही कार पेट्रोलसह CNG पर्यायात देखील येते. हे पेट्रोलवर १९.४ kmpl पर्यंत मायलेज देते तर CNG वर २७.१ km/kg पर्यंत मायलेज देते. ही कार तुम्हाला १ लाख डाऊन पेमेंट करुन घरी आणता येईल. चला तर या कारवरील फायनान्स प्लॅन जाणून घेऊया.

(हे ही वाचा : डाऊन पेमेंट न करता मारुतीची ३५ किमी मायलेज देणारी सुरक्षित कार आणा घरी, महिन्याला केवळ ‘इतका’ EMI द्यावा लागेल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Hyundai Exter S डाउनपेमेंट तपशील

Extor ची सर्वात कमी किंमत ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे Xtor S. त्याची एक्स-शोरूम किंमत ७.२७ लाख आहे. जर तुम्ही १ लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला ७,२५,८७२ रुपये कर्ज घ्यावे लागेल. कर्जाचा कालावधी ५ वर्षे आहे आणि व्याज दर ९ टक्के आहे. ६० महिन्यांसाठी तुम्हाला मासिक हप्ता म्हणून १५,०६८ रुपये भरावे लागू शकतात.