scorecardresearch

टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी Hyundai लवकरच आणणार ‘ही’ Micro Suv, भारतात चाचणीला सुरुवात

यामध्ये काय फिचर्स असणार आहेत आणि आणखी काय विशेष असणार आहे ते जाणून घेऊयात.

hyundai launched micro suv a3 i testing strated in india
Hyundai Micro Suv -संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Hyundai एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करत असते. सध्या बाजारामध्ये हॅचबॅक कार्सपेक्षा एसयूव्ही कार्स ट्रेंडिंगमध्ये आहेत.आतासुद्धा Hyundai India लवकरच आपली एक लहान आकाराची SUV लॉन्च करणार आहे. ही मॅक्रो एसयूव्ही थेट टाटा मोटर्सच्या Tata Punch शी स्पर्धा करणार आहे. भारतात या कारच्या चाचणी सुरु झाली असून, लवकरच तिला लॉन्च केले जाणायची शक्यता आहे. तर यामध्ये काय फिचर्स असणार आहेत आणि आणखी काय विशेष असणार आहे ते जाणून घेऊयात.

Hyundai Motor जी मायक्रो SUV लॉन्च करणार आहे. त्याचे नाव Hyundai Ai3 आहे. जरी कंपनीने अद्याप लॉन्चिंग ,नाव आणि किंमतीबद्दल कोणतीही घोषणा केली नाही. मात्र त्याची चाचणी सुरु असताना ही चार स्पॉट झाली होती. त्यामुळे तिच्याबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. Hyundai ची नवीन micro SUV चन लॉन्च झालेल्या Hyundai Grand no आणि जागतिक स्तरावर विक्री होणाऱ्या Hyundai Casper सारखीच असणार आहे. मात्र या एसयूव्हीचे डिझाईन खूपच वेगळे असणार आहे. यामध्ये बॉक्सची डिझाईन असणार आहे. नवीन Hyundai SUV मध्ये स्प्लिट हेडलाईटचे डिझाईन असेल. एक स्ट्राइटर बॉडी ज्यमुळे ती एसयूव्ही अधिक SUV-ish, टेल लॅम्प आणि त्याची लांबी ही ३.८ मित्र असू शकते.

हेही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘या’ दोन हायब्रिड कार, मायलेज ४० किमी, किंमत ८ लाखांपेक्षा कमी

Hyundai ने नवीन Ai3 SUV मधील इंजिन कसे असणार याबाबत खुलासा केलेला नाही आहे. मात्र रिपोर्टनुसार , त्याचे इंजिन हे १.२ लिटरचे असू शकते. जे Grand i10 Nios मध्ये वापरण्यात आले आहे. तसेच यासह ५-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो. हे इंजिन ८२ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते.

आगामी काळात लॉन्च होणाऱ्या या एसयूव्ही ला जागतिक स्तरावर Casper या मॉडेलद्वारे विक्री सुरु आहे. त्यामध्ये अनेक बदलांसह हे मॉडेल भरता लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. एंट्री-लेव्हल Hyundai mini SUV ची किंमत Venue compact SUV पेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे. कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल अर्थात CUV श्रेणीतील या कारचे सांकेतिक नाव Hyundai AI3 आहे आणि ती टाटा पंच, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर सारख्या कारशी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 10:02 IST

संबंधित बातम्या