वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सची मालकी असलेली जेएलआर म्हणजेच जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया (jaguar and land rover) ने भारतामध्‍ये ऑल-इलेक्ट्रिक जग्‍वार आय-पेस लाँच केली. लाँच झाल्‍यापासून जग्‍वार आय-पेसने ९० हून अधिक जागतिक पुरस्‍कार जिंकले आहेत, ज्‍यामध्‍ये २०१९ वर्ल्‍ड कार ऑफ द इअर अवॉर्ड्स येथे अनपेक्षित यश, वर्ल्‍ड कार डिझाइन ऑफ द इअर, वर्ल्‍ड ग्रीन कार आणि वर्ल्‍ड कार ऑफ द इअर या पुरस्‍कारांचा समावेश आहे, ज्‍यामधून बेंचमार्क ऑल-इलेक्ट्रिक परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही म्‍हणून या कारचा दर्जा अधिक दृढ होतो.

कमी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, प्रगत सस्‍पेंशन सिस्‍टम्‍स व प्रत्‍येक अॅक्‍सलवर सुसंगत, कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर्ससह आय-पेसमध्‍ये ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह कार्यक्षमता, सुधारणा व गतीशीलतेचे अद्वितीय संतुलन आहे, तसेच प्रभावी रिअल-वर्ल्‍ड रेंज, अपवादात्‍मक आरामदायीपणा व दैनंदिन उपयोजन आहे. वेईकलचे तंत्रज्ञान व वैशिष्‍ट्ये एकसंधी सॉफ्टवेअर-ओव्‍हर-द-एअर अपडेट्सचा वापर करत सतत सुधारण्‍यात आली आहे आणि आणखी वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात येणार आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Senior citizen ayushman bharat (1)
‘आयुष्मान भारत’ सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणार – भाजपाचे आश्वासन; याचे महत्त्व काय?
study of psychology, digital campaigning in elections
निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

(हे ही वाचा: BMW करणार धमाका! ‘या’ महिन्यात भारतात दाखल होणार जबरदस्त फीचर्सवाली नवीन कार, बुकिंगही सुरु )

आता आय-पेसमध्‍ये अधिक वैशिष्‍ट्यपूर्ण डिझाइन, संपन्‍न वैशिष्‍ट्ये, आर-डायनॅमिक मॉडेल्‍सची भर आणि पहिल्‍यांदाच दोन मेटलिक रंगांच्‍या निवडीमध्‍ये आकर्षक सॅटिन पेंट्ससह सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत.
वेईकल प्रोग्रामचे कार्यकारी संचालक निक कोलिन्‍स म्‍हणाले, ‘‘आय-पेसने नेहमी ग्राहकांना जग्‍वारमधून अपेक्षा असलेली कार्यक्षमता, गतीशीलता, तंत्रज्ञान व दैनंदिन उपयोजनाचे सर्वसमावेशक पॅकेजसोबत इलेक्ट्रिफिकेशनमधून सुलभ, शांत व प्रभावी ड्रायव्हिंग अनुभव दिले आहे. आम्‍ही तीच बाब डिलिव्‍हर केली आहे आणि आता अधिक क्‍यूरेटेड, संपन्‍न वैशिष्‍ट्ये देण्‍याच्‍या आमच्‍या दृष्‍टीकोनामधून आमच्‍या नवीन मॉडेलनी लाभ घेण्‍याची वेळ आली आहे.’’

तसेच भविष्‍याकडे पाहता आम्‍ही आमच्‍या इलेक्ट्रिफाईड वेईकल प्रोग्राम्‍समधून तंत्रज्ञान कौशल्‍याचा वापर करत आहोत आणि २०२५ पर्यंत जग्‍वारला ऑल-इलेक्ट्रिक मॉडर्न लक्‍झरी ब्रॅण्‍ड बनवण्‍यासाठी जग्‍वार टीसीएस रेसिंग टीमसह आमच्‍या सहयोगात्‍मक भागीदारीद्वारे सक्षम तंत्रज्ञान विकासाला चालना देत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

(Photo-जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया)

पुरस्‍कार-प्राप्‍त जग्‍वार आय-पेस आता अधिक वैशिष्‍ट्यपूर्ण

सर्वांगीण पॅकेज: कार्यक्षमता, सुधारणा, गतीशीलता व तंत्रज्ञानाच्‍या अद्वितीय संतुलनासह प्रभावी रिअल-वर्ल्‍ड रेंज आणि दैनंदिन उपयोजन.
तुम्‍हाला गरज असलेली रेंज आणि सुलभ होम चार्जिंग: संपूर्ण चार्जमध्‍ये जवळपास ४७० किमी (डब्‍ल्‍यूएलटीपी) आणि ११ केडब्‍लयू एसी वॉल बॉक्‍स व थ्री-फेज विद्युत पुरवठ्यामधून संपूर्ण चार्जसाठी जवळपास ९ तास लागतात.
अपवादात्‍मक कार्यक्षमता: २९४ केडब्‍ल्‍यू, ६९६ एनएम टॉर्क आणि इंटेलिजण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह वेईकला फक्‍त ४.८ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती देते.
अधिक वैशिष्‍ट्यपूर्ण डिझाइन: सुलभ नवीन ग्रिल, अॅटलास ग्रे फ्रण्‍ट अपेर्चेर ब्‍लेड्स व बॉडी-कलर डोअर फिनिशर्स आणि रिअर डिफ्यूजर उच्‍च विज्‍युअल इम्‍पॅक्‍ट व उपस्थितीसाठी आय-पेसची पुरस्‍कार-प्राप्‍त डिझाइन अधिक सुधारित करतात.
संपन्‍न वैशिष्‍ट्ये: आर-डायनॅमिक एसईमधील ब्‍लॅक पॅक स्‍टॅण्‍डर्ड आणि रेंजमधील प्रत्‍येक मॉडेलमध्‍ये आता डायमंड-टर्न्‍ड व्‍हील्‍ससह ग्‍लॉस डार्क ग्रे कॉन्‍ट्रॅस्‍ट पॅक आहे.
आकर्षक सॅटिन पेंट्स: आयशर ग्रे व नवीन कारपॅथियन ग्रे मेटलिक पेंट्ससाठी भर करण्‍यात आलेले सॅटिन फिनिश आय-पेसला अत्‍याधुनिक, समकालीन लुक देते.
आर-डायनॅमिक मॉडेल्‍स सादर: मॉडेल रेंजमध्‍ये आता आर-डायनॅमिक एस, आर-डायनॅमिक एसई, आर-डायनॅमिक एचएसईचा समावेश.