कियाने अधिकृतपणे किया इव्ही ६ (Kia EV6) भारतात आज म्हणजेच गुरुवारी लॉंच केला आहे. ही इलेक्ट्रिक कार दोन प्रकारांमध्ये आली आहे, ज्यात GT RWD आणि AWD व्हेरियंटचा समावेश आहे. कियाच्या इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित असलेली ही पहिली सर्व-इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये अनेक बॉडी स्टाइल आणि केबिन लेआउट्स उपलब्ध आहेत. नवीन किया कार सीबीयू मार्गाने मर्यादित संख्येत भारतात येईल, फक्त १०० युनिट्स उपलब्ध आहेत.

भारतात इव्ही लाँच करताना किया ने सांगितले की किया इव्ही ६ च्या या सर्व युनिट्सचे बुकिंग झाले आहे. खरं तर, कार निर्मात्याला इलेक्ट्रिक कारच्या ३५५ युनिट्ससाठी एकूण बुकिंग मिळाले आहे. किया इव्ही ६ च्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी या वर्षी सप्टेंबरपासून सुरू होईल.

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

(हे ही वाचा: सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध)

किंमत काय?

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर किया इव्ही ६ ची एक्स-शोरूम किंमत ५९.९५ लाख रुपये आहे.

(हे ही वाचा: ‘या’ कारने मार्केटमध्ये घातलाय धुमाकूळ; ७८ हजार लोक गाडीच्या डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत)

पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स

पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, किया इव्ही ६ दोन व्हेरियंटमध्ये येईल, एक परवडणारा रीअर व्हील ड्राइव्ह आणि दुसरा ऑल व्हील ड्राइव्ह. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ही कार ७७.४ kWh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज आहे. श्रेणीच्या दृष्टीने, किया इव्ही ६ एकाच चार्जवर WLTP-प्रमाणित ५२८ किमी पर्यंत जाऊ शकते, परंतु अधिकृत श्रेणीबद्दल काही विशिष्ट दावा केलेला नाही. किया त्याच्या १५ डीलरशिपवर १५० kW DC फास्ट चार्जर स्थापित करणार आहे जे इव्ही ६ फक्त ४० मिनिटांत १० टक्के ते ८० टक्के रिचार्ज करू शकते. ही कार केवळ ५.२ सेकंदात १०० किमीचा वेग पकडू शकते.

(हे ही वाचा: Electric Cycle: डुकाटीने लॉंच केली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल; एका चार्जवर चालते ५० किलोमीटर)

(फोटो: Kia India)

(हे ही वाचा: Maruti Brezza चे बुकिंग करा फक्त ‘इतक्या’ रुपयात, नवीन मॉडेलमध्ये मिळणार अत्याधुनिक फीचर्स)

फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, किया इव्ही ६ इलेक्ट्रिक कार नवीनतम फीचर्ससह सुसज्ज आहे जी अनेक लक्झरी कार मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते. कारमध्ये मुख्य इन्फोटेनमेंट तसेच ड्रायव्हर डिस्प्लेसाठी फ्लोइंग वक्र एचडी डिस्प्ले स्क्रीन आहे. कारच्या पुढील दोन सीटमध्ये झिरो-ग्रॅव्हिटी रिक्लाइन फंक्शन देण्यात आले आहे. आजच्या काळात लोकप्रिय पॅनोरामिक सनरूफ दिले आहे. चार्जिंगच्या विविध पर्यायांमुळे ते खास बनते. कारला सभोवतालची प्रकाश व्यवस्था, घरातील उपकरणे चार्ज करण्यासाठी मागील सीटखाली पॉवर आउटलेट आणि बरेच काही फीचर्स मिळतात.