Kia India कंपनीनं भारतीय बाजारात आपला पाया भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. Kia India ने ऑक्टोबर महिन्यात इतक्या Seltos गाड्या विकल्या की, Hyundai Creta ला टॉप १० च्या लिस्टमधून बाहेर केलं. त्याचबरोबर भारतीय बाजारात कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे भारतीय बाजाराचा अंदाज असल्याने कंपनी पुढच्या नवी गाडी लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे. कंपनी एसयूव्ही मॉडेल बाजारात आणणार की, नव्या सेगमेंटमध्ये डाव लावणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. कंपनी डिसेंबर महिन्यात याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या वर्षी भारतीय बाजारात गाडी येईल असं सांगण्यात येत आहे.

“भारतात गाड्या विक्री आणि निर्मितीसाठी चांगली स्थिती आहे. कंपनी २०२२ पहिल्या तिमाहित आपली नवी गाडी बाजारात आणू शकते “, असं Kia India चे सीईओ ताए-जिन पार्क यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Kia India कंपनी एमपीव्ही सेगमेंटमध्ये कार्निवल विक्री करत आहे. ही एक लक्झरी गाडी आहे. त्यामुळे नवी गाडी परवडणाऱ्या किंमतीत मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. Kia India ची नवी गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन इंजिन ऑप्शनसह येऊ शकते. त्याचबरोबर अनेक नवे फिचर्स असतील, असा अंदाज बांधला जात आहे.