Maruti Suzuki All-New Alto K10 features : मारुती सुझुकीने गुरुवारी (१८ ऑगस्ट) दिल्लीत आपल्या ‘ऑल न्यू अल्टो के १०’ मॉडेलचं लाँचिंग केलं. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी तकेउची यांनी या मॉडेलची वैशिष्ट्ये आणि किमतीही घोषणा केली. तसेच या कारमध्ये १५ हून अधिक सुरक्षाविषय फीचर देण्यात आल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या कारला प्रति लिटर २४.९० किलोमीटरचं अॅव्हरेज असल्याचा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. ही कार ४ व्हेरिएंट आणि सहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

कार लाँच करताना मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी तकेउची म्हणाले, “अल्टो २२ वर्षांच्या प्रवासत सलग १६ वर्षे देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. हाच वारसा अल्टो के १० पुढे नेईल. या कारमध्ये नवे डिझाईन, अद्ययावत तंत्रज्ञान, सुरक्षा विषयक फीचर, प्रशस्त इंटेरियर आणि के सीरीजचे १ लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.”

‘ऑल न्यू अल्टो के १०’ मॉडेलची वैशिष्ट्ये काय?

१. कारच्या समोरच्या बाजूला मधमाशांच्या पोळ्याच्या पॅटर्नप्रमाणे ग्रील
२. समोरून हसऱ्या चेहऱ्याचं युनिक डिझाईन
३. कारला नवीन ट्रेंडी हेडलाईट डिझाईन, व्हेरिएंटप्रमाणे यात बदल
४. कारला मोठी आर १३ (R13) व्हिल्स
५. संपूर्ण कारमध्ये उत्तम गुणवत्तेचा आवाज पोहचवणारं ‘फ्लोटिंग ऑडिओ युनिट’
६. बसताना पायांना आरामदायी वाटावं यासाठी डिझाईनमध्ये विशेष सुधारणा

अल्टो के १० च्या इंजिनची वैशिष्ट्ये काय?

१. के सीरीजमधील १ लिटर क्षमतेचं ड्युअर जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन.
२. ४९ केव्ही (६६.६२ पीसी), ५५०० आरपीएम पीक पॉवर आणि ८९ एनएस, ३५०० आरपीएम टॉर्क
३. २४.९० किलोमीटर प्रति लिटर इंधन क्षमता
४. कार व्हरिएंटमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट उपलब्ध

स्मार्ट कनेक्टिव्हिटी फिचर कोणते?

१. स्मार्ट फ्ले स्टुडिओ सिस्टम, स्मार्टफोन नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी (अॅपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो आणि इतर स्मार्टप्ले अॅप्स)
२. स्टेअरिंगवर ऑडिओ व व्हाईस कंट्रोल
३. पुढील आणि मागील दोन्ही दरवाजांवर स्पिकर्स
४. डिजीटल स्पिडोमीटर, फ्रंट पॉवर विंडोव स्विचेस

सुरक्षा विषयक फीचर कोणते?

१. ड्युअल एअरबॅग
२. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD)
३. प्री टेंशनर व फोर्स लिमिटर फ्रंट सीट बेल्ट
४. रिव्हर्स पार्किंग सेंसॉर
५. स्पीड सेंसिंग ऑटो डोअर लॉक आणि हाय स्पीड अलर्ट

हेही वाचा : Cheapest Cars India: देशातील टॉप ३ सर्वात स्वस्त कार, ४ लाखांच्या बजेटमध्ये, ज्या २४ kmpl पर्यंत मायलेज देतात

किंमत किती?

ऑल न्यू अल्टो के १० ची किंमत ३ लाख ९९ हजार रुपये इतकी आहे. मात्र, व्हेरिएंटनुसार या किमतीत बदलही होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१. Std व्हेरिएंट – ३ लाख ९९ हजार रुपये
२. Lxi व्हेरिएंट – ४ लाख ४२ हजार रुपये
३. Vxi व्हेरिएंट – ४ लाख ९९ हजार ५०० रुपये (ऑटो गेअर – ५ लाख ४९ हजार ५००)
४. Vxi+ व्हेरिएंट – ५ लाख ३३ हजार ५०० रुपये (ऑटो गेअर – ५ लाख ८३ हजार ५००)