Liger Mobility Electric Scooter: ऑटो एक्स्पो मोटर शो (Auto Expo 2023) सुरु व्हायला आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा ऑटो एक्स्पो मोटर शो होणार आहे. यामध्ये अनेक नवीन कार आणि बाईक सादर केली जाणार आहेत. यावर्षी १५ देशांतील ८०० हून अधिक कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यातच आता मुंबईस्थित लीगर मोबिलिटी (Liger Mobility) आपली पहिली सेल्फ बैलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर प्रदर्शित करू शकते. कंपनीने २०१९ मध्ये आपली पहिली सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर उघड केली. रिपोर्ट्सनुसार, आता ही स्कूटर उत्पादनासाठी तयार आहे.

Liger Mobility ची इलेक्ट्रिक स्कूटर कशी असेल खास?

लिगर मोबिलिटीची सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर रेट्रो स्टाइलिंगमध्ये आधुनिक वैशिष्ट्यांसह येते. ही स्कूटर Vespa प्रमाणेच डिझाइनमध्ये आहे. यात एक अद्वितीय डिझाइन एलईडी हेडलॅम्प आणि पुढील बाजूस एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत. स्कूटरमधील टर्न इंडिकेटर देखील LED मध्ये दिलेले आहेत.

Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Uttarakhand Bus Accident News
Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस

या सेल्फ-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ग्रॅब रेल, एलईडी टेल लाइट आणि समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशनसह विस्तृत आरामदायी आसन आहे. यात मॅट ब्लॅक फिनिशचे अलॉय व्हील आहेत. त्याच वेळी, ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस डिस्क आणि मागील बाजूस ड्रमचा वापर करण्यात आला आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होतेय लाँच; टाटाच्या ‘या’ कारशी होणार जोरदार टक्कर)

स्टँडशिवाय उभी राहणार स्कूटर

ही स्कूटर आपोआप बॅलन्स बनवते, त्यामुळे पार्किंग करताना स्टँडची गरज भासत नाही. ही स्कूटर बनवणार्‍या कंपनी लीगरने म्हटले आहे की, सेल्फ-बॅलेंसिंग स्कूटर राइडिंग सुरक्षित आणि चिंतामुक्त करते. ही स्कूटर आपोआप बॅलन्स करत असल्याने पहिल्यांदा स्कूटर शिकणाऱ्यांना पडण्याचा धोका असणार नाही.

अपघाताच्या वेळी वाचवणार जीव

स्कूटरचे सेल्फ बॅलन्सिंग तंत्रज्ञान इतके प्रभावी आहे की ही स्कूटर स्वार नसतानाही स्वतःचा समतोल राखू शकते. म्हणजेच या स्कूटरवरून उतरून स्टँड लावला नाही तरी ही स्कूटर पडणार नाही. इतकेच नाही तर स्कूटरला जोरात ढकलल्यानंतरही स्कूटरचा तोल बिघडत नाही. अपघाताच्या वेळी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते आणि दुचाकी चालकांना रस्त्यावर पडून अपघात होण्यापासून वाचवता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: जानेवारीमध्ये Maruti Suzuki करणार धमाका; सोबतच इलेक्ट्रिक कारही येणार)

व्हॉईस कमांडवर चालणार स्कूटर

सेल्फ बॅलेंसिंग तंत्रज्ञानाशिवाय ही स्कूटर तुमच्या आवाजावरही काम करेल. स्कूटरला अ‍ॅडव्हान्स व्हॉईस कमांड फीचर देण्यात आले आहे. तुम्ही व्हॉईस कमांड देऊन स्कूटरला पार्किंगमधून बाहेर काढू शकता. सध्या कंपनीने या स्कूटरबद्दल मर्यादित माहिती शेअर केली आहे. ही स्कूटर २०२३ च्या पहिल्या सहामाहीत भारतात लाँच केली जाऊ शकते.