Mahindra unveils four bold SUV: महिंद्राच्या एका गाडीची सध्या मार्केटमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. महिंद्रा कंपनीने बीई 6 बॅटमॅन एडिशन अखेर लाँच केलं आहे. या गाडीची डिझाईन आकर्षक आहे. यासाठी ऑटोमेकरने वॉर्नर ब्रदर्ससोबत सहकार्य केले आहे. त्यामुळे त्याच्या लूकची जोरदार चर्चा आहे. महिंद्राने १५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात आपल्या ४ कारचे अनावरण केले आहे. कंपनीने त्यात नवीन बोलेरो देखील जोडली आहे. कंपनी व्हिजन सिरीजमध्ये या ४ कार लाँच करण्याची तयारी करत आहे. व्हिजन एक्स प्रमाणे, व्हिजन टी, व्हिजन एस आणि व्हिजन एसएक्सटी कार उपस्थित आहेत. मात्र, कंपनीने वेगवेगळ्या डिझाइनसह चारही एसयूव्ही लाँच केल्या आहेत. महिंद्राच्या या चारही कार एनयू.आयक्यूच्या प्लॅटफॉर्मवर बनवल्या आहेत.
Vision.T – रॉयल ब्ल्यू-राखाडी लूकमध्ये दमदार SUV
Vision.T ही महिंद्राच्या Thar E चा अपग्रेडेड अवतार असून, ती Nu IQ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. तिचं बॉक्सी आणि मस्क्युलर डिझाइन, फ्लॅट बोनट, नवीन सिक्स-स्लॅट ग्रिल आणि स्क्वेअर हेडलाईट्स यामुळे ती रस्त्यावर एकदम किंग ऑफ द रोड वाटते. ब्ल्यू-राखाडी रंगाचा रॉयल कॉम्बिनेशन तिला प्रीमियम लूक देतो. आतमध्ये मोठा उभा टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि स्टिअरिंगवरच असलेलं स्टार्ट बटण हे सगळं तिचा दर्जा आणखी उंचावतात.
Vision.S – पिवळा-करडा (ब्लॅक) कॉम्बिनेशन, दमदार SUV स्टान्स
Vision.S ही कदाचित पुढच्या पिढीची इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड Scorpio असू शकते. उंच स्टान्स, मोठा आणि आक्रमक ग्रिल, आणि रॉयल पिवळा-करडा रंगसंगती तिला एक वेगळाच मजबूत पण स्टायलिश लूक देते. फॅमिली SUV असली तरी तिच्यातला पॉवरफुल रोड प्रेझेन्स खूपच प्रभावी आहे.
Vision.X राखाडी-करडा रंग आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स
Vision.X ही SUV Vision.T आणि Vision.S यांच्या मध्ये बसते, पण फॅमिली-ओरिएंटेड असल्यामुळे तिच्या डिझाइनमध्ये स्मूद लाईन्स आणि प्रीमियम फिनिश आहेत. राखाडी-करडा रंग आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स तिचं रिच आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. आतमध्ये आरामदायी आणि लक्झरी इंटिरियर आहे.
Vision.SXT – रॉयल ब्राऊन रंगातील अॅडव्हेंचर पिकअप
Vision.SXT ही महिंद्राच्या लाइनअपमधली सगळ्यात अॅडव्हेंचरस दिसणारी गाडी आहे. क्लॅमशेल बोनट, एक्स्पोज्ड हिंजेस, हेवी-ड्युटी बंपर – सगळं काही तिच्या ऑफ-रोड क्षमतेची खात्री देते. रॉयल ब्राऊन रंगामुळे ही SUV एकदम क्लास अपार्ट दिसते. ही केवळ गाडी नाही, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट आहे.