नुकतीच महिंद्राने भारतीय कार बाजारात आपली नवीन एक्सयूव्ही ७०० लाँच केली आहे. ही एक्यूव्ही एचडी स्क्रीन, सनरूफ आणि एडीएएस तंत्रज्ञानामुळे आधीच बाजारात धुमाकूळ घालत आहेत. अशात आज कंपनी नवीन एक्सयूव्ही ४०० इलेक्ट्रिक ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे. ही एक्सयूव्ही किंमत आणि फचर्सच्या बाबतीत टाटा नेकसॉनला टक्कर देण्याची शक्यता आहे.

आज जागतिक ईव्ही दिनाच्या निमित्ताने महिंद्रा आपली ही नवीन एक्सयूव्ही ४०० इलेक्ट्रिक आज लाँच करणार आहे. कंपनीने कारचा काही भाग जाहीर केला आहे. त्याचबरोबर कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोन टीझर व्हिडिओ देखील जारी केले आहेत. यातून गाडी बाहेरून निळ्या रंगाची दिसून येत आहे. त्याचबरोबर वाहनाचे फ्रंट ग्रील आणि लोगो देखील या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. वरवरती बघितल्यास हे वाहन एक्सयूव्ही ३०० सारखे दिसून येते, मात्र ते ३०० सारखे आहे किंवा नाही की वेगळे आहे हे आज होणाऱ्या लाँचिंग इव्हेंटमध्येच दिसून येईल.

(सिंगल चार्जमध्ये ४९० कि.मी चालते ‘ही’ इलेक्ट्रिक कार, ऑक्टोबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स)

वाहन एक्सयूव्ही ३०० सारखे?

एक्सयूव्ही ४०० इलेक्ट्रिक ही एक्सयूव्ही ३०० च्या ट्विक्ट वर्जनवर आधारित आहे. स्पाय इमेचवरून XUV400 XUV300 पेक्षा मोठी आणि ४ मीटर लांब असण्या अंदाज आहे. हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल्स हे जवळजवळ XUV300 सारखेच दिसून येत आहे. दुसरीकडे, बॉडी पॅनल्सची रचना महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी वापरलेल्या थीमच्या आधारावर असल्याचे समजते.

असा आहे साइड प्रोफाइल

वाहनाच्या ग्रीलवर महिंद्राचा कांस्य रंगाचा ट्विन पीक लोगो आहे. तो ग्रीलच्या मध्यफभागी दिसून येत आहे. नव्या एक्सयूव्हीचे साइड प्रोफाइल बहुतांश XUV300 सारखेच आहे. मागील भागात नवीन लायसन्स प्लेट, व्रॅपअराउंड टेल लॅम्प क्लस्ट आणि टेलगेटमुळे वाहनाचा मागचा भाग नवीन असल्याचे समजते.

(Honda लवकरच भारतात तीन नवीन बाईक लॉंच करणार, वाचा सविस्तर)

इतकी राहील किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Mahindra XUV 400 कंपनीच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमच्या नवीनतम आवृत्तीने सुसज्ज असेल, जे ईव्ही संबंधी डेटा सांगेल. वाहनात अडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंस सिस्टम म्हणजेच एडीएएस असण्याची शक्यता आहे. एक्सयूव्ही ४०० सिंगल इलेक्ट्रिक मोटर आणि फ्रंट व्हिल ड्राइव्ह प्रणालीसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक मोटर १५० बीएचीची पावर देण्याचा अंदाज आहे. हे वाहन १५ लाख रुपयांच्या शोरूम किंमतीसह बाजारात येण्याचा अंदाज आहे.