Mahindra xuv 700 delivery : सनरूफ, भन्नाट एडीएएस फीचरसह लाँच झालेली महिंद्रा एक्सयूव्ही ७०० वाहन बाजारात धुमाकूळ घालत आहे. अनेक प्रिमियम आलिशान एसयूव्हींना ती टक्कर देत आहे. मात्र तुम्ही जर Mahindra XUV 700 घेण्याचा विचार करत असाल तर डिलिव्हरीचे हे आकडे पाहून कदाचित तुमचे मन बदलू शकते. कारण महिंद्राने एक्सयूव्ही ७०० च्या ८० हजार युनिट्सची डिलिव्हरी अद्याप केलेली नाही. त्यातच महिन्याला ११ हजार बुकिंग होत असल्याचा खुलासा महिंद्राने केला आहे. त्यामुळे, कदाचित या एसयूव्हीचा प्रतीक्षा कालवधी वाढू शकतो. परिणामी तुम्ही ही एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वाट पाहावी लागू शकते.
नोव्हेंबर २०२२ पर्यंत एसयूव्ही वाहनांसाठी २.६० लाख बुकिंग झाले असून, ग्राहकांना अद्याप डिलिव्हरी व्हायची असल्याचा खुलासा महिंद्राने अलिकडेच केला होता. यामध्ये एक्सयूव्ही ३०० चे १३ हजार बुकिंग, थारचे २० हजार, बोलोरोचे १३ हजार, स्कॉर्पिओ रेंजच्या १.३० लाख आणि एक्सयूव्ही ७०० च्या ८० हजार बुकिंगचा समावेश आहे.
(टीव्हीएसच्या ‘या’ ई स्कुटरला लोकांची प्रचंड पंसती, एका दिवसात २०० स्कुटर्सची डिलिव्हरी)
महिंद्रानुसार, विद्यामान बुकिंग पूर्ण करण्यासाठी ते आर्थिक वर्ष २०२२ च्या तिमाहीतील २९ हजार युनिट्स प्रति महिना उत्पादन क्षमता आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीपर्यंत ४९ हजार युनिट्स प्रति महिना पर्यंत वाढवणार आहे. प्रतीक्षा कालावधी कमी करणे, निर्यात वाढवणे हा यामागचा हेतू आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही ७०० भारतात दोन इंजिन पर्यायासह मिळते. एसयूव्हीमध्ये २.० लिटर एम स्टालिएन टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर आणि २.२ लिटर एम हॉक डिझेल इंजिन मिळते. या वाहनाची किंंमत १३.४५ लाख ते २४.९५ लाखांपर्यंत (एक्सशोरूम) आहे. ही एसयूव्ही अल्कझार, टाटा सफारीला टक्कर देत आहे.