यंदाच्या नवरात्रीमध्ये २९ हजारांच्या डिस्काउंटवर खरेदी करा 'ही' कार | maruti alto 800 s cng gives mileage of 31 km know price discount offer and finance plan details prp 93 | Loksatta

यंदाच्या नवरात्रीमध्ये २९ हजारांच्या डिस्काउंटवर खरेदी करा ‘ही’ कार

जर तुम्ही या नवरात्रीच्या सणासुदीत कमी किमतीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती एकदा नक्की वाचा.

यंदाच्या नवरात्रीमध्ये २९ हजारांच्या डिस्काउंटवर खरेदी करा ‘ही’ कार
(फोटो- MARUTI SUZUKI)

देशातील कार क्षेत्रातील कमी बजेटच्या कारची मागणी पाहता कार निर्मात्यांनी प्रत्येक सेगमेंटमध्ये कमी किमतीच्या कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये आज आम्ही देशातील सर्वात कमी किमतीची कार मारुती अल्टो 800 S CNG बद्दल बोलत आहोत, जी सर्वात कमी किमतीतच नाही तर सर्वात कमी किमतीत सर्वाधिक मायलेज देखील देते.

जर तुम्ही या नवरात्रीच्या सणासुदीत कमी किमतीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या कारवर उपलब्ध डिस्काउंट ऑफर व्यतिरिक्त या कारची किंमत, फीचर्स आणि मायलेजची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

Maruti Alto 800 S CNG Price
Maruti Alto 800S CNG हा या कारचा CNG बेस व्हेरिएंट आहे ज्याची किंमत ५,०३,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन रोड असताना ५,६८,२७० रुपये आहे.

या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला कंपनीकडून २९ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय जर तुम्ही ही कार फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी केली तर तुम्हाला यासाठी बँकेकडून ५,११,२७० रुपयांपर्यंतचे कर्जही मिळू शकते.

आणखी वाचा : Car Discount Offers: ५ लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ‘या’ ४ कारवर ५० हजारांपर्यंतचा फायदा

Maruti Alto Engine and Transmission
मारुती अल्टो 800 मध्ये ०.८ लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ४८ पीएस पॉवर आणि ६९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. CNG किटवर त्याची पॉवर ४१ PS आणि पीक टॉर्क ६० Nm होते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Maruti Alto 800 S CNG Mileage
मारुती सुझुकीच्या मायलेजबद्दल असा दावा केला जातो की, ही कार पेट्रोलवर २२.०५ kmpl आणि CNG वर ३१,५९ kmpl मायलेज देते. कारचे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

सध्या दिल्लीत CNG ची किंमत ७५.६१ रुपये प्रति किलो आहे, त्यानुसार तुम्ही ही कार केवळ ७५ रूपयांच्या सीएनजीमध्ये ३१ किमी चालवू शकता.

Maruti Alto 800 S CNG Features
या कमी बजेटच्या कारमध्ये कंपनीने Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडो, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग, मागील पार्किंग सेन्सर, ABS EBD सारखी फीचर्स जोडली आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सणासुदीच्या काळात हिरोच्या बाइक्स झाल्या महाग, कंपनीने इतक्या रुपयांची केली वाढ

संबंधित बातम्या

२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद
पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
Electric Car vs petrol Car: कोणती कार ठरेल तुमच्यासाठी फायदेशीर? पेट्रोल की इलेक्ट्रिक ? वाचा सविस्तर
Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!
जबरदस्त मायलेजसह TVS Sport बाईक येथून करा खरेदी, कंपनी देईल १२ महिन्यांची वॉरंटी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : विद्यापीठाला तीन वर्षांसाठी सेट परीक्षेसाठी मान्यता
मुंबई: कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी
IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापत झाल्याने रोहित शर्मा रुग्णालयात दाखल
एक ‘झॉम्बी’ तर एक ‘लॉबीस्ट’ वसीम अक्रमने केले आत्मचरित्रात आश्चर्यकारक खुलासे
काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”