मारुती सुझुकी ते होंडा पर्यंत प्रीमियम हॅचबॅक कारची लांबलचक श्रेणी बाजारात उपलब्ध आहे. या सेगमेंटमधील कारपैकी एक मारुती बलेनो (Maruti Baleno) आहे जी या सेगमेंटमधील लोकप्रिय प्रीमियम कार आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती बलेनो झेटा (Maruti Baleno Zeta) प्रकाराबद्दल सांगत आहोत जे या कारचे टॉप एंड मॉडेल आहे. येथे तुम्हाला मारुती बलेनो झेटा खरेदी करण्याचा सोपा प्लॅन सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Maruti Baleno Zeta किंमत
Maruti Zeta व्हेरिएंटची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ८,२६,००० रुपये आहे, जी ९,३५,९४६ रुपये ऑन-रोडपर्यंत जाते. मारुती बलेनो झेटा ऑन रोड किंमतीनुसार, रोख पेमेंटमध्ये खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट सुमारे ९.३६ लाख रुपये असावे.

तुमच्याकडे एकत्र खर्च करण्यासाठी एवढी मोठी रक्कम नसल्यास किंवा तुम्हाला एवढी रक्कम एकाच वेळी खर्च करायची नसेल, तर ही कार खरेदी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोपे डाउन पेमेंट आणि मासिक EMI योजनेविषयी सांगणार आहोत.

(हे ही वाचा : मारुतीला टक्कर देण्यासाठी येतयं Hyundai ची ‘ही’ स्वस्त कार; फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क )

Maruti Baleno Zeta Finance plan
जर तुम्हाला मारुती बलेनोचा हा टॉप-एंड प्रकार विकत घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे ९९,००० रुपये असतील, तर ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटर नुसार फायनान्स प्लॅनचे तपशीलवार, बँक या कारसाठी ९.८ टक्के वार्षिक व्याजदरासहित ३६,९४६ रुपये कर्ज देऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती बलेनो झेटा वर कर्जाची ही रक्कम पास केल्यानंतर, तुम्हाला ९९,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार ५ वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला १७,७०० रुपये मासिक EMI भरावे लागेल.