सध्या सात सिटर वाहनांना मोठी मागणी आहे. अशा वाहनात किमान सात लोकांचे छोटे कुटुंब एकसाथ बसून जाऊ शकत असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत. सध्या भारतीय कार बाजारात अनेक सेवन सिटर कार उपलब्ध आहेत. मात्र मायलेज आणि ७ इंच टचस्क्रिनसह बाजारत उपलब्ध असलेली सुझुकी इर्टिगा नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. या वाहनाचे अपडेटेड व्हेरिएंट २०२२ फिलीपीन इंटरनॅशनल मोटर शोमध्ये लाँच करण्यात आले आहे. नवी २०२३ सुझुकी इर्टिगामध्ये काही खास फीचर देण्यात आले आहे. हे फीचर भारतातील व्हेरिएंटमध्येही नाही. मात्र ते देशात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहेत बदल?

अपडेटेड मॉडेलमध्ये मूळ डिझाइन जशीच्या तशी आहे. मात्र कंपनीने इंटेरियरमध्ये बदल केले आहेत. कार माइल्ड हाइब्रिड सिस्टिम असलेल्या पेट्रोल इंजनसह उपलब्ध होईल. त्याचबरोबर, कारमध्ये नवी ग्रिल, रिवाइज्ड फ्रंट बंपर आणि नवीन अलॉय व्हिल्स मिळतील. केबिनच्या आतमध्ये एमपीवी के डॅशबोर्ड आणि सिटांवर नवीन मेटॅलिक टिक फॉक्स वुड ट्रिम मिळेल.

(२ लाख ५० हजारांच्या आत मिळत आहेत ‘या’ २५० सीसी बाईक, अडव्हेंचर आणि स्ट्रिट बाईकरसाठी चांगला पर्याय)

हे सुरक्षा फीचर मिळेल

२०२३ सुझुकी इर्टिगामध्ये ७ इंचच्या टचस्क्रिन ऐवजी ९ इंचचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम मिळेल. यात सुझुकीचे स्मार्टप्ले प्रो तंत्रज्ञान आहे जे वॉइस कमांड आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानाला आधार देते. कनेक्टेड कार फीचरमध्ये चोरी झाल्याची सूचना आणि ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जियो फेसिंग, ड्राइव्हर बिहेव्हियर, ओव्हर स्पीडिंग अलर्ट आणि रिमोट फंक्शनचा समावेश आहे.

अपडेटेड इर्टिगा नव्या सराउंड व्ह्यू कॅमेऱ्यासह येईल. भारतातील इर्टिगालाही फेसलिफ्ट मिळाल्यास ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. अपडेटेड इर्टिगा पुढील वर्षी भारतात सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत माहिती आलेली नाही. पण सुझुकीने आंतरराष्ट्रीय बाजारात अपडेटेड मॉडेल सादर केल्याने भारतातही अपडेटेड मॉडेल सादर होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti ertiga 2023 launch in philippine international motor show ssb
First published on: 21-09-2022 at 19:00 IST