गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सच्या कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नेक्सॉन आणि पंच सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ज्या मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतात, ज्या लोकांना खूप आवडतात. टाटा पंच आणि नेक्सॉन काही महिन्यांपासून टॉप १० कारच्या यादीत आपले स्थान बनवत आहेत. असेही काही महिने होते जेव्हा टाटा पंचने विक्रीत मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारला मागे टाकले होते. मात्र, आता मारुतीने आपल्या जुन्या एसयूव्हींपैकी एक नवीन अवतारात आणून पुनरागमन केले आहे.

मारुती सुझुकीच्या एकमेव कॉम्पॅक्ट SUV Brezza बद्दल बोलत आहोत ज्याची विक्री सतत कमी होत होती. पण कंपनीने नवीन अवतारात लाँच करून ते मार्केटबाहेर जाण्यापासून वाचवले आहे. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती ब्रेझाने जानेवारी महिन्यात १४,३५९ युनिट्सची विक्री केली, तर टाटा मोटर्सने पंचच्या १२,००६ युनिट्सची विक्री केली. मारुती ब्रेझ्झाचे नवीन मॉडेल ग्राहकांना खूप आवडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

(हे ही वाचा : फीचर्समध्ये तडजोड नाही! मारुतीच्या सर्वात स्वस्त 7-सीटर कारने इतिहास रचला, किंमत ५.२५ लाख )

नवीन फेसलिफ्ट ब्रेझाने आपल्या घटत्या विक्रीची काळजी घेतली आहे आणि अल्टो, स्विफ्ट, वॅगनआर आणि बलेनो नंतर कंपनीची चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. मारुतीने जून २०२२ मध्ये नवीन ब्रेझा फेसलिफ्ट लाँच केली. ही कार ७.९९ लाख रुपये एक्स-शोरूम, दिल्लीच्या किमतीत उपलब्ध केले आहे.

मारुतीनं या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये बरेच नवे फीचर्स दिले आहेत. सर्वात लक्षवेधी बाब अशी की इलेक्ट्रिक सनरुफ असलेली ही पहिलीच कार आहे. नवीन ब्रेझाला अपडेटेड डिझाइन आणि वैशिष्ट्ये मिळतात. यामध्ये नवीन हेडलाइट आणि टेल लाईट युनिट्ससह एक नवीन बॉक्सी डिझाइन समाविष्ट आहे जे पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.