देशात कार खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाची पहिली पसंती मारुती सुझुकीची वाहने आहेत. याचे कारण कमी देखभाल, चांगले मायलेज आणि परवडणारी किंमत. यामुळेच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुतीची वाहने नेहमीच अव्वल स्थानावर राहतात. आता एकीकडे ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमती वाढवत आहेत, तेच दुसरीकडे मारुती सुझुकी कंपनीने आपल्या एका कारच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे मारुतीची स्वस्त कार तुम्हाला आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

आता प्रश्न पडतो की, ही कार नेमकी कोणती? तर मारुती सुझुकीच्या या स्वस्त कारचं नाव Alto K10 आहे. मारुती सुझुकीने आपल्या परवडणाऱ्या हॅचबॅक Alto K10 च्या किमती बदलल्या आहेत. कंपनीने त्याच्या काही व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत. अल्टो K10 च्या किमतीतील बदलांवर एक नजर टाकूया.

Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Vijay Sales announced Holi Sale For Customers up to sixty percent off on electronics Products speakers AC and more
आनंदाची बातमी! होळीच्या मुहूर्तावर खरेदी करा ‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तू; होईल पैशांची बचत, कुठे मिळतेय ‘ही’ भन्नाट ऑफर?

(हे ही वाचा : आनंदाची बातमी! २४ हजारांनी स्वस्त झाली जबरदस्त रेंजवाली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, आता फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये आणा घरी )

Alto K10 श्रेणीतील VXi AGS आणि VXi+ AGS प्रकारांच्या किमती ५,००० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. या प्रकारांच्या किमती आता अनुक्रमे ५.५६ लाख आणि ५.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहेत. या व्यतिरिक्त, अल्टो K10 च्या इतर व्हेरियंटच्या किमती बदलण्यात आलेल्या नाहीत. Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ५.९६ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी हा हॅचबॅक चार प्रकारांमध्ये विकत आहे, यामध्ये Std, LXi, VXi आणि VXi+ चा समावेश आहे.

Alto K10 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे इंधन कार्यक्षम इंजिन जे पेट्रोल आणि CNG दोन्हीमध्ये चांगले मायलेज देते. Alto K10 मध्ये, कंपनीने ९९९ cc १-लिटर K सीरीज पेट्रोल इंजिन दिले आहे जे ६७ bhp ची कमाल पॉवर आणि ८९ Nm टॉर्क जनरेट करते. ही कार पेट्रोलमध्ये २४ किलोमीटर प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये ३५ किलोमीटर मायलेज देते. म्हणजेच Alto K10 चालवण्याचा खर्च बाईक सारखाच आहे.

जर आपण वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर त्यात ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay, Android Auto, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, मॅन्युअली ॲडजस्टेबल ORVM सारखी वैशिष्ट्ये आहेत.