मारुती सुझुकी कंपनी तगडं मायलेज असणाऱ्या अनेक कार्स विकते. मारुतीची सेलेरियो ही हॅचबॅक कार या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ही देशातल्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या हॅचबॅक कार्सपैकी एक आहे. ही कार स्वस्त आहेच, तसेच कंपनीने या महिन्यात या कारवर ५४ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंटही जाहीर केला आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये येते. पेट्रोलवर ही कार २६.६८ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर सीएनजीवर ही कार तब्बल ३५.६० किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. या कारची सुरुवातीची किंमत ५.३७ लाख रुपये इतकी आहे.

मारुती सुझुकीने या कारच्या व्ही, झेड आणि झेड प्लस मॉडेलच्या मॅन्युअल ट्रान्समिशनवाल्या व्हेरिएंट्सवर ३५ हजार रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. तर या कारच्या सीएनजी एलएक्सआय व्हेरिएंटवर कंपनी ३० हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या ऑफर्सह १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. या कारच्या एएमटी व्हेरिएंटवर १० हजार रुपयांची रोख सूट आणि १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस तसेच ४,००० रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात आला आहे. या कारच्या काही मॉडेल्सवर सर्व ऑफर्स मिळून ग्राहक ५४,००० रुपयांपर्यंतची बचत करू शकतात.

या कारमध्ये ३२ लीटर क्षमतेचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. या कारचा फ्यूल टँक पूर्ण भरून तुम्ही प्रवासाला सुरुवात केलीत तर ही कार २६.६८ किमी प्रति लीटर प्रमाणे एकूण ८५३ किमीपर्यंतचं अंतर कापू शकते. म्हणजेच या कारची टाकी फुल करून तुम्ही पुण्यावरून बंगळुरूपर्यंत नॉनस्टॉप प्रवास करू शकता. तसेच तुम्ही दिल्ली ते उदयपूर आणि दिल्ली ते श्रीनगरपर्यंतचा प्रवास करू शकता. मायलेजच्या बाबतीत या कारसमोर मारुतीच्या इतर कार किंवा ह्युंदाई, टाटा आणि महिंद्राच्या कार मागे पडतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा >> Petrol-Diesel Price on 16 June: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

या कारमध्ये तुम्हाला १.० लीटर थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. तसेच यात स्टार्ट-स्टॉप सिस्टिमही मिळेल. या कारचं इंजिन ८६ एचपी पॉवर आणि ८९ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड एएमटी गिअरबॉक्स मिळेल.