Maruti Suzuki recalls 87,599 units: भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली काही वाहने परत मागविली आहेत. वाहनांमध्ये काही समस्या आली आहे, यामुळे अनेक वाहने परत मागवण्यात आली आहेत. मारुती सुझुकीने S-Presso आणि Eeco मॉडेल्सच्या ८७,५९९ युनिट्स परत मागवल्या आहेत. सदोष स्टीयरिंग टाय रॉड बदलण्यासाठी कंपनीने ही वाहने परत मागवली आहेत. मारुतीने ५ जुलै २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तयार केलेली वाहने परत मागवली आहेत.

मारुती सुझुकीने सांगितले की, ‘अशा वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या स्टीयरिंग टाय रॉडच्या एका भागात संभाव्य दोष असल्याचा संशय आहे, जे काही क्वचित प्रसंगी तुटून वाहन चालविण्यावर आणि हाताळणीवर परिणाम करू शकते. मारुती सुझुकीची अधिकृत डीलर वर्कशॉप तपासणीसाठी आणि दोषपूर्ण भाग बदलण्यासाठी प्रभावित वाहन मालकांशी संपर्क साधेल. दोष आढळल्यास बदली विनामूल्य केली जाईल.

(हे ही वाचा : आली रे आली! Honda ची १२५ CC ची Mini Bike; १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल ७० किमी, किंमत तर… )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुतीने २०१९ मध्ये S-Presso लाँच केले. त्याची नवीन आवृत्ती १ लीटर पेट्रोल इंजिन आणि आयडल-स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने गेल्या वर्षी सादर करण्यात आली आहे. त्याची सुरुवातीची किंमत ४.२६ लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही कार २५.३km/l मायलेज देऊ शकते. ड्युअल एअरबॅग्ज, हाय-स्पीड अलर्ट सिस्टीम आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सर्व प्रकारांमध्ये मानक आहेत. तर मारुती इको ही सर्वाधिक विक्री होणारी व्हॅन आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ५.२४ लाख रुपयांपासून सुरू होते.