भारतातील सर्वात मोठी कार निर्माता असलेली कंपनी मारूती सुझुकी लवकरच आपली सगळ्यात प्रीमियम कार ५ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. कंपनी आजवरची सर्वात मोठी कार मारूती सुझुकी Invicto लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग होण्यापूर्वी १९ जूनपासून कारच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. मारूती सुझुकी आणि टोयोटो यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आलेली ही चौथी कार असणार आहे. मात्र अधिकृतपणे लॉन्च होण्याआधी इनव्हिक्टोला एका डिलरशिपवर पाहण्यात आले आहे. ज्यमुळे याच्या डिझाईनबाबत काही खुलासे झाले आहेत. ही मारूतीची कार नवीन ग्रँड विटारा आणि हायरायडरसारखीच असणार आहे.

५ जुलै रोजी लॉन्च होणाऱ्या Invicto ला हायक्रॉसच्या तुलनेमध्ये थोडीशी वेगळी ग्रील मिळेल. इनव्हिक्टोमध्ये ग्रिलवर दोन क्रोम स्लॅट्स आहेत जे हेडलाइट्सच्या दिशेने मोठे होतात. जे नवीन ब्रिझाच्या ग्रील प्रमाणे दिसते. हेडलाईट्समध्ये Nexa चे सिग्नेचर थ्री-ब्लॉक DRL आणि पुन्हा डिझाईन केलेला बंपर असेल. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : लवकरच लॉन्च होणार मारूती सुझुकी MPV Invicto; जाणून घ्या डिझाईन आणि फीचर्स

Invicto च्या मागील बाजूस नेक्सा टेल लॅम्पचे डिझाईन मिळते. आणि व्हील्स आर्चभोवती प्लास्टिक क्लॅडिंग्ज मिळणार नाही. या किरकोळ बदलांव्यतिरिक्त दोन्ही MPV मागील बाजूने एकसारख्याच दिसतात. ग्रँड विटाराला ज्या प्रमाणे तयार केले जात त्याच प्रमाणे मारूती सुझुकी Invicto ला टोयोटाद्वारे बंगळुरू येथील बाहेरील प्लांटमध्ये तयार केले जाईल. Invicto मध्ये टोयोटा हायक्रॉसच्या इंजिनचा सपोर्ट असणार आहे. ज्यामध्ये २.० लिटरचे पेट्रोल हायब्रीड युनिट असेल आणि ते ई-CVT शी जोडलेले असेल. हे इंजिन १८४ बीएचपी जनरेट करते. हे मारूती सुझुकीचे भारतातील पहिले ऑटोमॅटिक मॉडेल असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारूती सुझुकी Invicto ५ जुलै रोजी लॉन्च होणार आहे. जुलैमधील कंपनीची लॉन्च होणारी ही प्रमुख कार असणार आहे. तसेच ही कार टोयोटा, हायक्रॉसशी स्पर्धा करेल. इनोव्हा हायक्रॉसची एक्सशोरूम किंमत ही २५.०३ लाख रुपये इतकी आहे. तर इनव्हिक्टोची किंमत यापेक्षा थोडीशी कमी असण्याची शक्यता आहे