Maruti Electric Car: मारुती सुझुकी कारची (Maruti Suzuki Car) लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि आता कंपनीने एक नवीन छोटी कार तयार केली आहे, जी एक छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही कार आहे. कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. कंपनीच्या ४१व्या अन्युअल जनरल मीटिंगमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आरसी भार्गव यांनी सांगितले की नवी इलेक्ट्रिक कार अपर सेगमेंटमध्ये लाँच करण्यात येईल.

कशी खास असेल मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार?

५०० किमी रेंज
मारुतीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2WD आणि 4WD अशा दोन्ही प्रकारच्या ड्राइव्हट्रेन पर्यायांसह येईल. 2WD प्रकारात ४८kWh बॅटरी पॅक आणि १३८bhp मोटर मिळू शकते. सुमारे ४०० किमीची रेंज देणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, 4WD प्रकारात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि एक मोठा ५९kWh बॅटरी पॅक असेल. त्याची रेंज सुमारे ५०० किमी असू शकते. या नव्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची पसंती मिळेल, आरसी भार्गव यांनी म्हटले आहे.

(आणखी वाचा : एकच नंबर! बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतेय Kia ची ‘ही’ कार; काय तो लूक, अन् फीचर्स, सर्वकाही जबरदस्त…)

कधी होणार लाँच?

ऑटो एक्सपो २०२३ या कार्यक्रमांत मारुती सुझुकी कंपनी इलेक्ट्रिक कारचं प्रोटोटाईप मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. मात्र, या कारची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ वर्षात देशात अनेक इलेक्ट्रिक कार होणार लाँच
मारुती सुझुकीसह टाटा मोटर्स आणि महिंद्रा देखील इवी पोर्टफोलियोचा विस्तार वेगाने करत आहेत. एमजी ऑटो, हुंडई इंडिया आणि किआ इंडिया या कंपन्यासुद्धा इलेक्ट्रॉनिक गाडी लाँच करण्याची तयारी करत आहेत. पुढील २ वर्षात भारतात २५ नव्या इलेक्ट्रिक कार लाँच होण्याची शक्यता आहे.