एमजी मोटर इंडिया (MG Motor India) ने या महिन्यात आपली नवीन MG ZS EV इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे. आता या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. एमजी मोटर इंडियाच्या मते, या इलेक्ट्रिक कारला १ महिन्यापेक्षा कमी कालावधीत १५०० प्री-बुकिंग मिळाले आहेत. इलेक्ट्रिक कार असल्याने, हे आकडे बरेच चांगले म्हणता येतील. फेब्रुवारी २०२२ मध्ये जुन्या ZS EV च्या फक्त ३८ युनिट्सची विक्री झाली होती. विशेष म्हणजे, दोन प्रकारांमध्ये येणारी नवीन ZS EV सध्या फक्त एकाच प्रकारात (एक्सक्लुझिव्ह) बुकिंगसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत २५.८८ लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

(हे ही वाचा: Toll Tax Hike: पेट्रोल-डिझेलनंतर जनतेला आणखी एक फटका! आजपासून टोल टॅक्स महागला)

मोठी बॅटरी आणि चांगली रेंज

MG ZS EV मध्ये मोठी ५०.३kWH बॅटरी देण्यात आली आहे. पूर्वी यात ४४.७kWh बॅटरी युनिट मिळत असे. नवीन बॅटरी १४३bhp पॉवर आणि ३५३Nm टॉर्क वितरीत करते. केवळ ८.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग गाठण्याचा दावा करतो. नवीन ZS इलेक्ट्रिकला एका चार्जवर ४६१km ची रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे. जुन्या मॉडेलने पूर्ण चार्ज केल्यावर ४१९km पोहोचवण्याचा दावा केला होता.

फोटो: financial express

(हे ही वाचा: Jeep Meridian: ७ सीटर एसयूव्हीचे भारतात अनावरण; जाणून घ्या फीचर्स आणि अन्य तपशील)

पहिल्या तिमाहीत ६९% वाढ

२०२१ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या तिमाहीत MG मोटर इंडियाच्या विक्रीत 69% वाढ झाली आहे. कार निर्मात्याने मार्च २०२२ मध्ये एकूण ४७२१ वाहने विकली आणि या काळात कोविड-१९ चे नवीन प्रकार आणि जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर चिप्सची कमतरता यासारख्या समस्यांमुळे पुरवठा आव्हानांना तोंड द्यावे लागले. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने ५,५२८ मोटारींची किरकोळ विक्री केली होती.