Mid-Size SUV Sales in Jan 2024: भारतीय बाजारपेठेत मिड साईज एसयूव्हींना मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन कंपन्यांचं वर्चस्व पाहायला मिळतो. इतरही कंपन्यांच्या कार या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये, मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटने महिना-दर-महिना (MoM) आधारावर सुमारे २७ टक्के वाढ नोंदवली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक संयुक्तपणे शीर्षस्थानी आहेत, तर बहुतेक SUV ने गेल्या महिन्यात सकारात्मक MoM विक्री वाढ दर्शविली आहे. Scorpio ने जानेवारी २०२४ मध्ये मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री केली आहे. यानंतर महिंद्रा XUV700 दुसऱ्या स्थानावर आहे. जानेवारी २०२४ मध्ये मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये टॉप-५ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV च्या विक्रीचे आकडे आणि MoM वाढीबद्दल जाणून घेऊया…
जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-५ मध्यम आकाराच्या SUV
१. महिंद्रा स्कॉर्पिओची जानेवारी २०२४ मध्ये १४ हजार २९३ युनिट्सची विक्री झाली तर डिसेंबर २०२३ मध्ये ११ हजार ३५५ युनिट्सची विक्री झाली. महिन्या-दर-महिन्यानुसार त्याच्या विक्रीत २५.८७ टक्के वाढ झाली आहे.
२. महिंद्रा XUV700 ने जानेवारी २०२४ मध्ये ७ हजार २०६ युनिट्स विकल्या, तर डिसेंबर २०२३ मध्ये ५ हजार ८८१ युनिट्स विकल्या गेल्या. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर त्याच्या विक्रीत २२.५३ टक्के वाढ झाली आहे.
३. टाटा सफारीने जानेवारी २०२४ मध्ये २ हजार ८९३ युनिट्सची विक्री केली तर डिसेंबर २०२३ मध्ये २ हजार १०३ युनिटची विक्री झाली. महिन्या-दर-महिन्यानुसार त्याच्या विक्रीत ३७.५६ टक्के वाढ झाली आहे.
४. टाटा हॅरियरने जानेवारी २०२४ मध्ये २ हजार ६२६ युनिट्सची विक्री केली तर डिसेंबर २०२३ मध्ये १ हजार ४०४ युनिट्सची विक्री झाली. महिन्या-दर-महिना आधारावर त्याच्या विक्रीत ८७.०३ टक्के वाढ झाली आहे.
५. Hyundai Alcazar ने जानेवारी २०२४ मध्ये १ हजार ८२७ युनिट्सची विक्री केली तर डिसेंबर २०२३ मध्ये ९५४ युनिट्सची विक्री झाली. महिन्या-दर-महिन्यानुसार त्याच्या विक्रीत ९१.५ टक्के वाढ झाली आहे.