Smart Shopping Tricks: एखाद्या सर्वसामान्य कुटुंबासाठी कार विकत घेणे म्हणजे कित्येक वर्षाची बचत जोडून पूर्ण केलेलं स्वप्न असतं. अशावेळी जिथे काही हजारही वाचवता येतील ते वाचवण्याचा ग्राहकांचा प्रयत्न असतो. येत्या काही दिवसात येणाऱ्या दसरा- दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण चारचाकी विकत घेतात. तुमचेही कार विकत घेण्याचे नियोजन असेल तर आज आपण यासाठी काही स्मार्ट टिप्स पाहणार आहोत.

तुम्हाला माहीत आहे का अनेक कारनिर्मात्या कंपनी या विशिष्ट फीचरसाठी कारच्या किंमतीत अवाजवी दर आकारत असतात. त्यामुळे कार विकत घेण्याआधी तुम्हाला मूळ रक्कमेत किती अतिरिक्त फीचरचे दर आकारले आहेत हे तपासून घ्या. कारची निवड करताना सुद्धा आपण खालील काही फीचर वगळून कार तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

(नितीन गडकरी यांचं ‘हे’ स्वप्न पूर्ण झालं तर.. प्रत्येक कुटुंबाच्या दारात उभी राहिल फॅन्सी कार, पहा प्लॅन)

सनरूफ

सनरूफ म्हणजेच गाडीच्या छतावरून बाहेर येण्यासाठी असणारी छोटीशी खिडकी. अनेक विशिष्ट कारमध्ये असणारी ही चैनीची सोय आता सर्वच गाड्यांमध्ये उपलब्ध होऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटासारखं वाटावं अशी ही हटके सिस्टीम भारतात मात्र फार आवश्यक नाही, मुळात उन्हाळ्यात भर उन्हात तुम्ही ही सुविधा वापरत नाही आणि पावसाळ्यात तर साहजिकच याचा वापर शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तात गाडी घ्यायची असेल तर हे फीचर तुम्ही वगळू शकता

ऑटोपायलट

टेस्लाचे स्वप्नवत वाटणारे ऑटोपायलट फीचर भारतात सुद्धा एमजी, महिंद्रा, होंडा, ह्युंदाई सारख्या कारमध्ये उपलब्ध आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही किमया सुरक्षा व सुविधेची हमी देते. पण अर्थात यामुळे आपले काही अडून राहत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या कारमध्ये हे फीचर वगळले तरी चालू शकते.

भारतातील रस्त्यांची परिस्थिती आणि रहदारीच्या परिस्थितीमुळे सेल्फ-ड्राइव्ह प्रणालीवर अवलंबून न राहणेच सध्यातरी हिताचे ठरेल. यामुळे तुम्ही बजेटमध्ये सुद्धा मोठी बचत करू शकाल.

अलेक्सा/गुगल होम कनेक्टिव्हिटी

उन्हाळ्याच्या दिवसात कारमध्ये जाण्यापूर्वी आपल्यासाठी एसी चालू करून ठेवू शकेल, किंवा कारचे लॉक तपासून पाहू शकेल अशी प्रणाली कोणाला आवडणार नाही? पण जर तुम्हाला बजेट मध्ये गाडी घ्यायची असेल तर या बोनस पण महाग फीचरला वगळणे फायद्याचे ठरेल.

हवा शुद्धीकरण प्रणाली

मेट्रो शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण पाहता कारमध्ये हवा शुद्धीकरण प्रणाली कुटुंबांसाठी एक मोठे वरदान ठरू शकते. मात्र जर तुम्ही कार कंपनीकडून शुद्धीकरण प्रणाली घेत असाल तर अनेकदा ही डील महाग पडू शकते. यापेक्षा कार विकत घेऊन मग तुम्ही ऑनलाईन प्युरिफायर घेणे कमी खर्चिक ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वयंचलित हवामान नियंत्रण

जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असलेली कार असेल, तर तुम्हाला तापमान आणि एसीचा वेग वारंवार नियंत्रित करत राहावे लागणार नाही. पण काही सेकंदाचा वेळ वाचवण्यासाठी अतिरिक्त पाच दहा हजार खर्च करणे विनाकारण ठरेल. इथे तुम्ही पैसे वाचवू शकता.