भारतीय वाहन बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कार निर्माता कंपनी कियाने आता त्यांच्या सोनेट रेंजमध्ये द न्यू सोनेट मॉडेल सादर केलं आहे. १०० देशांत ही कार निर्यात करण्यात येणार असून सर्वात आधी भारतीय बाजारपेठेत या कारचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे. २० डिसेंबरपासून या कारचे बुकींग सुरू होईल. नव्या सोनेटमध्ये १० सर्वोत्तम फिचर्सचा समावेश असल्याचा दावा किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई जिन पार्क यांनी केला आहे.
भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण अधिक आहे. चालकांच्या चुकीमुळे हे अपघात होतात. असे संभाव्य अपघात रोखता यावेत याकरता या कारमध्ये खास यंत्रणा देण्यात आली आहे. फ्रंट कोल्यूजन वॉर्निंग, फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट, लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट यंत्रणांमुळे रस्ते अपघात रोखता येतील आणि अपघातांमुळे होणारे मृत्यूंचही प्रमाण कमी होऊ शकेल. तसंच, एकाच लेनमध्ये चालकाने गाडी चालवण्याकरता लागणारी लेन फॉलोइंग असिस्ट यंत्रणाही या गाडीत बसवण्यात आली आहे. या कारमध्ये अशाप्रकारे जवळपास १० सर्वोत्तम फिचर्स देण्यात आले असून २५ पेक्षा जास्त सुरक्षात्मक वैशिष्ट्येही ग्राहकांसाठी देण्यात आली आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे.
तसंच, या कारमध्ये विषाणू आणि जीवणूंपासून सुरक्षेसाठी स्मार्टप्युअर एअर प्युरिफायरही देण्यात आले आहेत. ही कार डिझेल आणि पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. नवीन Kia Sonet आठ सिंगल-टोन पर्यायांसह अनेक रंग पर्याय देण्यात आले आहेत. ऑलिव्ह, व्हाइट, सिल्व्हर, ग्रे, ब्लॅक , लाल, निळा आणि पांढरा. शिवाय, मॅट शेड केवळ X लाइन प्रकारासाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये १०.२५ इंच मुख्य टचस्क्रीन डिस्प्ले आणि अतिरिक्त १०.२५ इंच LCD ड्रायव्हर डिस्प्ले युनिट आहे. मॉडेलमध्ये ३६०-डिग्री कॅमेरा, स्मार्ट एअर प्युरिफिकेशन सिस्टम, उच्च-गुणवत्तेची सात-स्पीकर बोस साउंड सिस्टीम, इलेक्ट्रिक सनरूफ आणि Amazon Alexa सोबत एकत्रित केलेले Kia Connect Skill यासारख्या अॅडव्हान्स फीचर्सचा देखील समावेश आहे.
दरम्यान, या गाडीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसून जानेवारी महिन्यात या कारची किंमत ग्राहकांना कळू शकेल.
ही आहेत दहा सर्वोत्तम फीचर्स
१. फ्रंट कोल्यूजन वॉर्निंग
२. फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट पेडस्टेरियन
३. फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट सायकलिस्ट
४. फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट कार
५. लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट
६. लेन डिपार्चर वॉर्निंग
७. लेन कीप असिस्ट
८. लेन फॉलोइंग असिस्ट
९. हाय बीम असिस्ट
१०. ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग
सेफ्टी फीचर्स
१. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)
२. व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (व्हीएसएम)
३. हिल-स्टार्ट कंट्रोल (एचएसी)
४. फ्रंट ड्युअल एअरबॅग्ज
५. फ्रंट सीट साइड एअरबॅग्ज
६. साइड कर्टन एअरबॅग्ज
७. अँटी-लॉक ब्रेक सिस्टिम (एबीएस)
८. ब्रेक फोर्स असिस्ट सिस्टिम (बीएएस)
९. रिअर पार्किंग सेन्सर्स
१०. इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस)
११. हायलाइन टायर प्रेशर मॉनिटर
१२. 1स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक
१३. इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक
१४. 3-पॉइंट सीटबेल्ट्स (फ्रंट अँड रिअर ऑल सीट्स)
१५. सीट बेल्ट रिमाइंडर (फ्रंट अँड रिअर ऑल सीट्स)
नव्या सोनेटमध्ये नेमके बदल काय?
१. क्राऊन ज्वेल एलईडी हेडलॅम्प्स
२. स्टार मॅप एलईडी डीआरएल्स
३. स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प्स
४. स्लीक एलईडी फॉग लॅम्प्स् (जीटीएक्स+/एक्स लाइन) आणि आइस क्यूब एलईडी फॉग लॅम्प्स (एचटीके+, एचटीएक्स आणि एचटीएक्स+)
५. स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प्स
६. स्पोर्टी एअरोडायनामिक स्किड प्लेट्स
७. आर १६ क्रिस्टल कट अलॉय व्हील्स
८. बॉडी कलर रिअर स्पॉयलर (जीटीएक्स+/एक्स – लाइन)
९. न्यू बम्पर डिझाइन
१०. ८ मोनोटोन, २ ड्युअल टोन आणि १ मॅट फिनिश कलर
११. नवीन प्यूटर ऑलिव्ह बॉडी कलरचा समावेश