भारतातील ग्राहकांची SUV वाहने खरेदी करण्याची क्रेझ सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळेच कंपन्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात SUV कार सादर करीत आहेत. यातच आता Renault पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय बाजारात आपली लोकप्रिय कार नव्या अवतारात सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Renault ने भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशन डस्टरच्या आगमनाची अधिकृत पुष्टी केली आहे. तथापि, लॉन्चची टाइमलाइन अद्याप समोर आलेली नाही. पण, हे २०२५ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. पूर्वी रेनॉल्ट फक्त ५-सीटर डस्टर विकत असे. परंतु यावेळी त्याची ७-सीटर आवृत्ती देखील सादर केली जाऊ शकते. लाँच झाल्यानंतर ही कार बाजारपेठेत Kia Seltos, Hyundai Creta, Toyota Hyrider, Maruti Grand Vitara आणि Honda Elevate सारख्या SUV ला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : मारुती अन् टाटानंतर आता ‘या’ कंपनीचा ग्राहकांना दणका, गाडीच्या किमती वाढणार; स्वस्तात कार खरेदीची संधी कधीपर्यंत? )
अलीकडेच, Renault कार कंपनीकडून त्यांच्या नवीन Duster एसयूव्ही कारचे जागतिक प्रीमियर नुकतेच पोर्तुगालमध्ये पार पडले. नवीन डस्टर खूपच आकर्षक दिसत आहे. त्याची लांबी ४.३४ मीटर आहे. यात स्लिम Y-आकाराचे LED DRLs आहेत, जे त्याच्या स्लिम ग्रिलपर्यंत पोहोचतात. बंपरवर गोलाकार फॉग लॅम्प असेंब्ली आहे आणि त्याच्या जवळ एअर व्हेंट्स आहेत. साइड प्रोफाईलमध्ये सुधारित छतावरील रेल, स्पॉयलर, टेपरिंग रियर क्वार्टर ग्लास, नवीन डिझाइन केलेले १८-इंच ब्लॅक-आउट अलॉय व्हील, आरशांच्या खाली ब्लॅक-आउट व्हर्टिकल ‘शॅडो लाईन्स’ आणि मागील बाजूस दरवाजाच्या खाली ताजे क्लेडिंग वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या मागील बाजूस Y आकाराचे टेललॅम्प आहेत.
भारतात येणार्या नवीन रेनॉल्ट डस्टरमध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप असू शकतो, ज्यामध्ये इंफोटेनमेंटसाठी १०.१-इंच टचस्क्रीन आणि ड्रायव्हरसाठी ७-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. यात तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळू शकते, ज्यावर अनेक नियंत्रणे देखील मिळू शकतात. याशिवाय ADAS तंत्रज्ञान, सहा स्पीकर्ससह Arkamys 3D साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देखील असू शकतात.
जागतिक स्तरावर, नवीन डस्टर तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. १.६L, ४-सिलेंडर पेट्रोल हायब्रिड, १.२L, ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि १.० लिटर पेट्रोल-LPG चा समावेश आहे. पहिले दोन पर्याय भारतातही मिळू शकतात.