जपानी ऑटोमेकर कंपनी निसान इंडिया भारतीय बाजारपेठेत लवकरच आपले इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ‘ब्लॉक युवर डेट’ आमंत्रण पाठवले आहे, ज्यावर ‘मूव्ह बियॉन्ड’ असे लिहिले आहे. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. मात्र, कंपनीने आगामी नवीन मॉडेलबाबत मौन बाळगले आहे. पण ते इलेक्ट्रिक वाहन असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या, कंपनी भारतीय बाजारपेठेत निसान मॅग्नाइट सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि किक कॉम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री करते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैशिष्ट्ये

निसान लीफ ८.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह निसानकनेक्ट तंत्रज्ञान आणि Android ऑटो, Apple कारप्ले स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येते. हे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करते. यात एक ई-पेडल प्रणाली आहे, जी ड्रायव्हरला फक्त एक पेडल वापरून वेग वाढवण्यास, वेग कमी करण्यास आणि वाहन थांबविण्यास सक्षम करते.

आणखी वाचा : अर्रर…बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच ‘एलएमएल’च्या इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो झाला लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये…

निसान लीफ इलेक्ट्रिक कार ही जपानी ऑटोमेकरची इलेक्ट्रिक कार आहे. हे ४०kWh ली-आयन बॅटरी पॅक आणि EM५७ इलेक्ट्रिक मोटरसह येते. हा सेटअप १४६bhp पॉवर आणि ३२०Nm टॉर्क वितरीत करतो. निसान लीफ रेंज एका चार्जवर २४० किमी चालते. हे 3kWh आणि 6kWh AC चार्जरसह येते, जे त्याचा बॅटरी पॅक अनुक्रमे १६ तास आणि ८ तासांमध्ये चार्ज करू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nissan leaf electric car will be launched in india on this day pdb
First published on: 28-09-2022 at 19:41 IST