Odysse HyFy Electric Scooter Launched in India: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत कंपन्या नवनवी वाहने सादर करीत आहेत. आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्‍स या भारतातील झपाट्याने वि‍कसित होणाऱ्या प्रीमियम इलेक्ट्रिक व्हेइकल उत्‍पादक कंपनीने सर्वसामान्यांसाठी परवडणारी अशी आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत दाखल केली आहे.

पाच रंग पर्यायांसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

मुंबईतील EV कंपनी Odysse Electric ने आपली Odysse HyFy electric scooter लाँच केली आहे. Odysse HyFy या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत. या स्कूटरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने पाच रंग पर्यायासह ही स्कूटर लाँच केली आहे. त्यामध्ये रॉयल मॅट ब्लू, सिरॅमिक सिल्व्हर, ऑरोरा मॅट ब्लॅक, फ्लेअर रेड व जेड ग्रीन या रगांचा समावेश आहे.

Odysse HyFy electric scooter फीचर्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरमध्ये सिटी राइड मोड, रिव्हर्स मोड व पार्किंग मोड यांसारखे स्मार्ट मोड आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोलसारखे वैशिष्ट्यदेखील आहे. त्याशिवाय यात एक LED डिजिटल मीटर आहे, जे बॅटरी लेव्हल, स्पीड व राइड मोड यांसारखी सर्व महत्त्वाची माहिती एका नजरेत दाखवते. तसेच, त्यात अंडरसीट स्टोरेजखील उपलब्ध आहे, जिथे तुम्ही हेल्मेट किंवा इतर वस्तू ठेवू शकता.

बॅटरी आणि चार्जिंग

या स्कूटरचा स्पीड २५ किमी प्रतितास आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ही स्कूटर ७० ते ८९ किमी अंतर कापू शकते, जी शहरातील दैनंदिन वापरासाठी योग्य आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच HyFy मध्ये २५०W मोटर आहे. त्यात ४८V आणि ६०V असे दोन बॅटरी पर्याय आहेत. या बॅटरी चार्ज करण्यासाठी चार ते आठ तास लागतात. ही स्कूटर जास्त आवाज न करता चालते. Odysse HyFy ला फक्त बजेट स्कूटर मानणे चुकीचे ठरेल. कारण- त्यात प्रगत अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जी बहुधा फक्त महागड्या स्कूटरमध्ये दिसतात.

बुकिंग सुरु

Odysse HyFy ची विक्री १० मे २०२५ पासून सुरू झाली आहे. ग्राहक देशभरातील Odysse डीलरशिप नेटवर्कवरून किंवा प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ते Odysse HyFy ची सहजपणे बुकिंग करू शकतात. त्याशिवाय कंपनीने सुरुवातीच्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्सदेखील जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये विशेष सवलती आणि अतिरिक्त वॉरंटीयुक्त फायदे समाविष्ट आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत किती?

मुंबईतील EV कंपनी Odysse Electric ने ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ४२,००० रुपये (एक्स-शोरूम)च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे.