दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची मागणी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे ऑटोमेकर्सनी त्यांच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कमी किमतीपासून ते मोठ्या रेंजपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.

बाजारातील इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये आम्ही ओकाया फास्ट या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलत आहोत, जी कंपनीची लोकप्रिय स्कूटर आहे आणि ती तिच्या रेंज आणि स्पीडमुळे पसंत केली जाते.

जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर इथे तुम्ही या ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल किंमत, बॅटरी, रेंज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स यासारख्या संपूर्ण तपशीलांसह जाणून घेऊया.

आणखी वाचा : १ लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतेय Maruti WagonR, वाचा संपूर्ण ऑफर

ओकाया फास्टच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये ७२ V, ६० Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरीसोबत १२०० W BLDC मोटर जोडलेली आहे. बॅटरी पॅकच्या चार्जिंगबद्दल कंपनीचा दावा आहे की, ओकाया फास्ट नॉर्मल चार्जरने चार्ज केल्यानंतर ४ ते ५ तासांत पूर्ण चार्ज होते.

स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही ओकाया फास्ट १४० ते १६० किमीची रेंज देते. या रेंजसह, कंपनी ६० kmph च्या टॉप स्पीडचा दावा करते.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवण्यात आले आहेत, जे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमला जोडलेले आहेत. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.

आणखी वाचा : Tata Motors ची इलेक्ट्रिक कार झाली महाग, जाणून घ्या कोणत्या मॉडेलची किंमत वाढली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फीचर्सबद्दल बोलताना, कंपनीकडे DRLs, चार्जिंग पॉइंट, फास्ट चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, सेंट्रल लॉकिंग, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, ICDT असे अनेक फीचर्स दिले आहेत. यामध्ये पार्किंग मोड, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यांचा देखील समावेश आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ओकाया फास्टची सुरुवातीची किंमत ९९ हजार रुपये (एक्स-शोरूम) सह बाजारात लॉंच केली आहे. या ओकाया फास्टची ही सुरूवातीची किंमत देखील तिची ऑन-रोड असतानाची किंमत आहे.