Electric Scooter Offer: गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांनी (ईव्ही) सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटर्सला मागणी वाढत आहे. यातच देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटरवर खरेदीवर मोठी बचत करता येणार आहे.

ओला इलेक्ट्रिकने S1 X+ इलेक्ट्रिक स्कूटरवर २० हजार रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्यानंतर या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ८९ हजार ९९९ रुपये झाली आहे. यापूर्वी या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख ०९ हजार ९९९ रुपये होती. ही ऑफर मर्यादित काळासाठी वैध असेल. ही ऑफर कंपनीच्या ‘डिसेंबर टू रिमेंबर’ मोहिमेचा भाग असून ही ऑफर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे.

या वर्षअखेरीच्या योजनेव्यतिरिक्त, कंपनी आपल्या ई-स्कूटरसाठी विविध वित्तपुरवठा पर्याय ऑफर करत आहे जसे की निवडक क्रेडिट कार्ड्सवर ५ हजार रुपयांपर्यंत सूट, डाउन पेमेंट, ० प्रक्रिया शुल्क आणि ६.९९ टक्के अत्यंत कमी व्याजदर देत आहे.

(हे ही वाचा : ना बजाज, ना हिरो कोणीच टिकणार नाय? आता होंडाची बाईक देशात नव्या अवतारात दाखल होणार )

Ola S1 चे स्पेसिफिकेशन्स

ओला S1 ही पॉवरट्रेन एका चार्जवर जास्तीत जास्त १५१ किमीची IDC रेंज देते. खरी श्रेणी इको मोडमध्ये सुमारे १२५ किमी आणि सामान्य मोडमध्ये १०० किमी आहे. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ही इलेक्ट्रिक स्कूटर ३.३ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड ताशी ९० किमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Ola S1 ची वैशिष्ट्ये

५००W पोर्टेबल चार्जर वापरून बॅटरी ७.४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन राइड मोड आहेत. यात ५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस अनलॉक, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील आहे.