देशात इलेक्ट्रिक वाहनांचा कल झपाट्याने वाढत आहे. त्याच वेगाने ओला इलेक्ट्रिक देखील आपली पकड मजबूत करत आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉंच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक २०२४ पर्यंत लाँच करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air च्या लाँच दरम्यान, कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारसह लवकरच इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती दिली. या बाईक बद्दल लवकरच सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : Maruti Suzuki Brezza CNG variant पुढील महिन्यात लाँच होणार; लाँचिंगआधीच डिझाईन आणि फीचर्स समोर, जाणून घ्या कशी असेल नवीन कार

मिळालेल्या माहितीनुसार, ओलाची येणारी ही इलेक्ट्रिक बाईक मध्यम आकाराची असून प्रीमियम रेंजमध्ये असेल. ही बाईक प्रीमियम रेंजमध्ये जरी असली तरी ती हाय परफॉर्मन्स बाईक म्हणून ओळखल्या जाण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक बाइक नॉर्मल मोडमध्ये प्रति चार्ज १२० ते १५० किलोमीटरचा वेग देण्यात सक्षम असेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola to launch electric bike pdb
First published on: 28-10-2022 at 11:14 IST