आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अनेकांना संघर्षमय काळातून जावं लागतं. भविष्यातील यशासाठी वर्तमान सुखांचा त्याग करावा लागतो. प्रश्न मुलांच्या करियरचा असेल तर मुलांसह पालकांनाही खडतर परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सिमरन थोरातने असंच सातासमुद्रापार जाण्याचं आणि सुमद्रावर स्वार होण्याचं स्वप्न पाहिलं. पण हे स्वप्न पूर्ण करणं सोपं नव्हतं. सिमरनला मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचं होतं. यासाठी पुण्यात सदर शिक्षणाचा तीन वर्षांचा कोर्स आहे, त्याचं शैक्षणिक शुल्क आहे ९ लाख रुपये. सिमरनचे आई-वडील इंदापूर तालुक्याच्या बाहेर फारसे कधी गेले नव्हते. पण आपल्या मुलीची सागरसफर यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःची तीन एकरची शेती विकली. ज्या शेतात मका, गहू आणि ऊस पिकवून कुटुंबाचा गाडा चालत होता, ती जमीन लेकीच्या स्वप्नांसाठी ओवाळून टाकली.

द इंडियन एक्सप्रेसने सिमरन थोरातच्या या यशोगाथेचा सविस्तर लेख सादर केला आहे. सिमरन थोरात सांगते, “माझ्या आईने दहावीपर्यंतचेही शिक्षण घेतलेले नाही. तरीही तिने माझ्यासाठी वडिलांची समजूत घातली. माझ्या भावाच्या शिक्षणासाठी वडिलांनी आधीच जमिनीचा एक तुकडा विकला होता. आता माझ्या शिक्षणासाठी उरली-सुरली जमिनही विकून टाकली. जमीन विकल्यानंतर माझे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करू लागले, ज्याचे आयटीआयमधून त्यांनी शिक्षण घेतले. तर आईने इंदापूरच्या फरेरो चॉकलेट फॅक्टरीत काम करण्यास सुरुवात केली. माझ्या आई-वडिलांच्या त्यागामुळे मी आज पुणे जिल्ह्यातील प्रथम मर्चंट नेव्ही ऑफिसर झाली आहे. तसेच माझ्या सीसपॅन कंपनीतील मी एकमेव महिला अधिकारी आहे.”

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”

काँग्रेसच्या तिकीटासाठी महिलेने दिला उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा; पक्षाने नाकारली उमेदवारी, आता…

आर्थिक प्रश्न सुटल्यानंतर दुसरी सर्वात मोठी अडचण होती, समाज काय म्हणेल? ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धत आहे. कुटुंबातील एक महिला महिनो न महिने दूर एका जहाजावर अनोळखी लोकांबरोबर कशी राहिल? असे प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले. पण सिमरनच्या वडिलांनी समाजाच्या या प्रश्नांना बळी न पडता आपल्या मुलीच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे सिमरन सांगते.

सिमरनचा भाऊदेखील याच क्षेत्रात कार्यरत आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून काम करतोय. आपल्या पालकांची सुरुवातीच्या काळातील भीती दूर करण्याचे काम सिमरनचा भाऊ शुभम थोरातने केले. शुभम म्हणाला, “मी अद्याप कोणत्याही जहाजावर महिला सहकाऱ्यांसह काम केले नाही. तरी मी माझ्या बहिणीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. कारण या क्षेत्रातील आव्हाने पेलण्याची जिद्द आणि ताकद तिच्यात आहे, याची मला पूर्ण खात्री आहे.” शुभम सध्या एका जपानी शिपिंग कंपनीत कार्यरत आहे.

प्रेरणादायी…! वयाचे बंधन ओलांडले; नऊवारी नेसून अन् डोक्यावर पदर घेऊन आजीबाई गिरवताहेत शिक्षणाचे धडे

आर्थिक-सामाजिक अडथळे दूर केल्यानंतर काही शिक्षणाशी, भाषेशी संबंधित अडचणी होत्या. आठवीपर्यंत केवळ मराठी माध्यम आणि त्यानंतर सेमी इंग्रजीत शिक्षण झाल्यामुळे मर्चंट नेव्हीचा पूर्णपणे इंग्रजी भाषेत असलेला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे तसे आव्हानच होते. तरीही सिमरनने मेहनत करत हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतरच्या घटना सांगताना सिमरन म्हणाली, मी माझ्या बॅचमधील इतर मुलींप्रमाणेच चांगली विद्यार्थीनी होते, पण सुरुवातीच्या प्लेसमेंट फेरीत मला नाकारण्यात आले. माझे इंग्रजी अस्खलित नसल्यामुळे मला एका मोठ्या शिपिंग कंपनीतील नोकरी नाकारली गेली. मी निराश झाले, पण त्यातूनही स्वतःला सावरत आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. मी भावाशी फोनवर इंग्रजीत बोलू लागले. आरशासमोर तासनतास इंग्रजी बोलण्याचा सराव केला. अखेरच्या वर्षात सीस्पॅन कंपनी जेव्हा प्लेसमेंटसाठी आली, तेव्हा त्यांनी माझी महिला डेक कॅडेट म्हणून निवड केली. याआधी सीस्पॅन कंपनीत एकाही महिलेने काम केलेले नाही.

अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

अलीकडच्या काळात मर्चंट जहाजांवर सागरी चाच्यांचे हल्ले वाढले आहेत. याबाबत भीती वाटते का? असा प्रश्न विचारला असता सिमरन सांगते की, आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. आम्हाला सर्व आणीबाणीच्या प्रसंगासाठी प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. तरीही असे काही प्रसंग घडू नयेत, याची मी प्रार्थना करते. सिमरनने आतापर्यंत तीन जहाजांतून सफर केली आहे. लवकरच ती चौथ्या जहाजाची सफर करणार असल्याचे सांगते.

दरम्यान सिमरन आणि शुभम हे दोघे भावंडे इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जमीन ते आपल्या आई-वडिलांना भेट म्हणून देणार आहेत.