PMV EaS E launched in india : काही दिवसांपूर्वी मुंबई येथील ईव्ही कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिकने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये कारच्या किंमतीविषयी आणि फीचरबाबत प्रचंड उत्सुकता होती. कार आल्टोपेक्षाही छोटी असेल असे काही अहवालातून समोर आले होते. आज अखेर कंपनीने आपली EaS – E ही कार भारतीय ग्राहकांसाठी लाँच केली आहे. विशेष म्हणजे, या ई कारची किंमत केवळ ४.७९ लाख रुपये आहे.
किंमत
ईएएस ई ही २ सीटर माइक्रो इलेक्ट्रिक कार आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमधील ती सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार असून ती सर्वात स्वस्तही आहे. कारची किंमत ४.७९ लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. मात्र, ही किंमत सुरुवातीच्या १० हजार ग्राहकांसाठीच ठरवलेली असून त्यानंतर किंमत वाढण्याची शक्यता आहे.
(सीएनजी वाहनाची ‘अशी’ करा देखभाल, सुरक्षित होईल प्रवास, इंजिनलाही होणार नाही नुकसान)
ग्राहक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही कार बुक करू शकतात. कंपनी बुकिंगसाठी दोन हजार रुपयांचे टोकन अमाउंट घेत आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारसाठी ६ हजार बुकिंग झाल्या आहेत.
भारतातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार
पीएमव्ही ईएएस ई ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. कारची लांबी २९१५ मिमी, रुंदी ११५७ मिमी आणि उंची १६०० मिमी आहे. कारमध्ये १७० मिमीचा ग्राउंड क्लिअरेन्स मिळतो.
रेंज
कार फुल चार्जनंतर १२० ते २०० किमी पर्यंतची रेंज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कारमधील बॅटरी ४ तासांत फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कार कोणत्याही १५ ए आउटलेटने चार्ज होऊ शकते. कंपनीकडून ३ किलो वॉट एसी चार्जर दिला जात आहे.