Toyota Innova Hycross: जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटारची सर्वाधिक विक्री होणारी कार टोयोटा इनोव्हाने एमपीव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे, ती लवकरच एका नवीन अवतारात दिसणार आहे. ही नवीन कार पूर्वीपेक्षा खूप वेगळी असेल. टोयोटाने नुकताच इनोव्हा हायक्रॉसचा टीझर रिलीज केला आहे. टोयोटाची नवीन एमपीव्ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉस याच महिन्यात २५ नोव्हेंबरला लाँच होणार आहे. परंतु, त्यापूर्वी या कारचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. या गाडीची किंमत ३५ ते ४० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या नवीन कारमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.

नव्या इनोव्हामध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स

  • या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या नव्या इनोव्हामध्ये आणखी जबरदस्त फीचर्स असणार आहेत. या MPV मध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा आणि इतर अनेक वैशिष्ट्यांस येण्याची शक्यता आहे.

( आणखी वाचा : Maruti Suzuki India: भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालायला आली मारुतीची ‘ही’ जबरदस्त कार; दमदार मायलेजसह मिळतील भन्नाट फीचर्स, किंमत फक्त… )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • या गाडीत सेफ्टी सेंसर असणार आहे. यामुळे प्री कोलिशन सिस्टम, डायनामिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक हाय बीम सारखे फीचर्स दिले आहेत.
  • नव्या मॉडेलमध्ये टेलगेट, एलईडी हेडलँप आणि स्टॉप लँप, अंडर फ्लोअर स्टोरेज, ओटोमन फंक्शनसह कॅप्टन सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि ३६० डिग्री कॅमेरा दिला आहे. या गाडीमध्ये २.० लीटर हायब्रिड पॉवरट्रेन असणार आहे.
  • नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सध्याच्या पिढीतील इनोव्हा क्रिस्टा सोबत विकली जाईल. तथापि, हायक्रॉस अधिक प्रीमियम ऑफर असेल. नवीनतम जनरेशन हायक्रॉस मोनोकोक चेसिसवर आधारित असेल आणि इनोव्हा क्रिस्टापेक्षा लांब असेल.