कार क्षेत्रातील MPV विभागाला त्याच्या ७ सीटर कारसाठी प्राधान्य दिले जाते ज्यांचा वापर कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्हीसाठी केला जातो. जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला ७ सीटर प्रीमियम कार घ्यायची असेल तर जाणून घ्या रेनॉल्ट ट्रायबरसाठी उत्तम फायनान्स प्लॅन…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Renault Triber  किंमत

आज आपण Renault Triber च्या बेस मॉडेल RXE बद्दल बोलत आहोत, ज्याची दिल्ली मध्ये एक्स-शोरूम किंमत ५,९९,८०० रुपये आहे. ट्रायबर बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत ६,६७,४७८ रुपयांपर्यंत जाते.

जर तुम्हाला ही 7 सीटर एमपीव्ही रोख पेमेंटद्वारे खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला ६.६७ लाख रुपये लागतील. परंतु येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही १ लाख रुपये भरूनही ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

(हे ही वाचा : Hyundai ची जबरदस्त फीचर्सने भरलेली नवी कोरी कार ८० हजारात खरेदी करा, महिन्याला भरा ‘इतका’ EMI )

Renault Triber फायनान्स प्लॅन

जर तुम्ही ही SUV फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुमच्याकडे १ लाख रुपये असल्यास बँक या MPV वर ५,६७,४७८ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जावर ९.८ टक्के वार्षिक व्याजदर लागू होईल.

Renault Triber डाउन पेमेंट आणि मासिक EMI

Renault Triber वर कर्ज मंजूर झाल्यावर, तुम्हाला १ लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर पुढील ६० महिन्यांसाठी दरमहा १२,००१ चा मासिक EMI भरावा लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renault triber rxe base model finance plan with down payment 1 lakh know how much monthly emi will cost in 5 years pdb
First published on: 24-01-2023 at 15:43 IST