scorecardresearch

३ नवीन रंगांमध्ये सादर झाली ROYAL ENFIELD HIMALAYAN; यूएसबी पोर्टही दिले, पाहा फोटो

रॉयल इन्फिल्डच्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्स पसंत करणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल इन्फिल्डने आपली लोकप्रिय हिमालयन बाईक तीन नव्या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध केली आहे.

३ नवीन रंगांमध्ये सादर झाली ROYAL ENFIELD HIMALAYAN; यूएसबी पोर्टही दिले, पाहा फोटो
(pic credit – financial express)

ROYAL ENFIELD HIMALAYAN : रॉयल एन्फिल्ड ही देशातील लोकप्रिय बाईक कंपनी आहे. कंपनीच्या ताफ्यातील क्रूजर, अ‍ॅडव्हेंचर आणि इतर बाईक्स आपल्या दमदार इंजिन, डिजाईन आणि रंग पर्यायांमुळे इतर बाईक्सच्या तुलनेत उठून दिसतात. त्यामुळे, रायडर्सच्या मनात या बाईक्सविषयी मोठे स्थान आहे. दरम्यान रॉयल एन्फिल्डच्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्स पसंत करणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल एन्फिल्डने आपली लोकप्रिय हिमालयन बाईक तीन नव्या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध केली आहे. या बाईकची किंमत २.१५ लाख रुपये आहे.

कंपनीने रंग पर्यायांसह काही सुधारणादेखील केल्या आहेत. बाईक आता ग्लेशियर ब्ल्यू, स्लिट ब्लॅक आणि ड्युन ब्राऊन या नव्या रंगांमध्ये सादर झाली आहे. बाईक ग्रावेल ग्रे, पाइन ग्रिन आणि ग्रॅनाइट ब्लॅक या जुन्या रंगांसहदेखील उपलब्ध आहे. बाईक ग्रिल आणि साईड पॅनलवर डिबॉस्ड लोगो मिळत असून एक यूएसबी चार्जिंग पोर्टदेखील मिळत आहे.

Royal Enfield Himalayan
Royal Enfield Himalayan (pic credit – financial express)

(१ डिसेंबरपासून हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींची वाढणार किंमत)

नोव्हेंबर २४ पासून ही बाईक बुकिंग आणि टेस्ट राईडसाठी भारतातील सर्व रॉयल एन्फिल्ड स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली होती. बाईकची किंमत २ लाख १५ हजार ९०० रुपये (एक्स शोरूम, चेन्नई) इतकी आह. ही बाईक पहिल्यांदा २०१६ मध्ये सादर करण्यात आली. तेव्हापासून ती रायडर्समध्ये लोकप्रिय आहे.

Royal Enfield Himalayan
Royal Enfield Himalayan (pic credit – financial express)

सध्या रॉयल इन्फिल्डच्या ताफ्यात अलीकडेच लाँच केलेली हंटर ३५०, क्लासिक ३५०, मेटिऑर ३५० क्रुजर, इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी, हिमालयन अ‍ॅडव्हेंचर टुरर, स्क्रॅम ४११ एडीव्ही क्रॉसओव्हर आणि बुलेट ३५० बाईकचा समावेश आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 18:21 IST

संबंधित बातम्या