कारच्या कमिती खूप वाढल्या आहेत, आणि पुढील वर्षी त्या अजून वाढणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, नवी कार घ्यायची की सेकंड हँड कार? कोणती कार बेस्ट राहील, सेकंड हँड कार घेतल्यावर तिच्या मेन्टेनन्सचे काय? नंतर बिघाड तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न ग्राहकाला पडतात. या प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यातून तुम्हाला कार निवडणे सोपे जाईल.

१) मेन्टेनन्स

जर तुम्ही नवी कार घेतली तर मेन्टेनन्ससाठी तुम्हाला कमी खर्च लागेल, कारण नव्या कारमधील सर्व भाग नवे असतात आणि त्यांचे आयुष्य देखील मोठे असते. सुरुवातीच्या २ ते ३ सर्व्हिस या मोफत होतात. मात्र, नव्या कारची किंमत ही सेकंड हँड कारच्या तुलनेत अधिक असते. तेच सेकंड हँड कार खरेदी केल्यानंतर हजारो रुपयांचे काम निघू शकते. तसेच, नकळत आपघाग्रस्त वाहन खरेदी केले तर सौदा तोट्याचा ठरू शकतो. म्हणून मेन्टेनन्सच्या बाबतीत नवी कार त्रासदायक ठरत नाही.

(कार दीर्घकाळ बंद ठेवू नका, अधूनमधून चालवत राहा, अन्यथा होईल ‘हे’ मोठे नुकसान)

२) प्रगत तंत्रज्ञान

बाजारात एकापेक्षा एक प्रगत तंत्रज्ञान असलेल्या कार्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्यात एडीएस सुरक्षा फीचर मिळत आहे आणि अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाने त्या परिपूर्ण आहेत. तेच सेकंड हँड कारमध्ये तुम्हाला जुने फीचर्स आणि तंत्रज्ञान मिळते. तुमच्या आवश्यक्तेनुसार तुम्हाला फीचर मिळत असतील तर सेकंड हँड कार तुम्ही घ्या. मात्र, ती घेण्याआधी मेकॅनिककडून तिला तपासून घ्या. कारमध्ये काही बिघाड आहे का, किंवा तिचा कुठला पार्ट खराब झाला आहे का, याबाबत मेकॅनिक माहिती देऊ शकते. तसेच तो किंमतीबाबतही माहिती सांगू शकते.

३) जुन्या कारवर व्याज कमी

सेकंड हँड वाहनांवर बँक कमी व्याज घेते. तेच नव्या कारवर अधिक व्याज वसूल करते. या पार्श्वभूमीवर तुमचा बजेट अधिक नसेल किंवा तुम्हाला कार हवीच असेल तर सेकंड हँड कार तुमच्यासाठी चांगला पर्याच ठरू शकते.

(फॅमिलीसह करता येणार ऑफरोडिंग, फोर्स गुरखा ५ डोअर थार, जिम्नीला देणार आव्हान, किंमत केवळ..)

४) जुनी कार घेणे योग्य आहे का?

तुम्ही नुकतीच ड्राइव्हिंग शिकले असाल तर जुनी कार घेणे योग्य आहे. चालवताना कारचे चुकून काही नुकसान झाले, तर याने फार निराशा होणार नाही. मात्र, नव्या कारसोबत काही झाले तर चालकाला अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात.