scorecardresearch

Premium

केवळ १ ते २ लाखांमध्ये घरी घेऊन जा Hyundai i10, गॅरंटी आणि वॉरंटी सुद्धा मिळणार

कार सेक्टरमध्ये कमी बजेटच्या कारची लांबलचक रेंज मिळते, ज्यांची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून सुरू होते, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना कार घ्यायची आहे, परंतु ३ लाख रुपयांच्या बजेटमुळे कार घेता येत नाही.

Hyundai-i10-12
(फोटो- CARDEKHO)

जर तुम्हीही बजेटच्या कमतरतेमुळे कार खरेदी करू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला ह्युंदाई i10 ही हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार, गॅरंटी, वॉरंटी आणि कर्ज यांसारख्या आकर्षक योजनांसह अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याचे संपूर्ण डिटेल्स सांगत आहोत.

परंतु कमी किमतीत Hyundai i10 खरेदी करण्याचा प्लॅन जाणून घेण्याआधी, तुम्ही या कारची फिचर्स, स्पेसीफिकेशन आणि मायलेजची संपूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे.

Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
mumbai air pollution marathi news, flu patients rise in mumbai, flu patients increased in mumbai, flu patients increased by 20 to 30 percent in mumbai
मुंबई : वायू प्रदूषणामुळे मागील काही दिवसांत फ्लूच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ
Loss of Rs 3 per liter on sale of diesel to public sector oil distribution companies
डिझेलवर तेल कंपन्यांना लिटरमागे तीन रुपयांचा तोटा; वर्षाहून अधिक काळ टाळलेल्या किंमतवाढीचा परिणाम
CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Hyundai i10 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झालं तर ते १०८६ cc सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये दिले गेले आहे जे ६८.१ bhp ची पॉवर आणि ९९.१ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Hyundai i10 कारच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, मॅन्युअल एसी, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो यासारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार २०.३६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 : ही क्रूझर बाईक ७२ हजार ते १ लाखांपर्यंत मिळत आहे, जाणून घ्या ऑफर

Hyundai i10 ची फिचर्स आणि स्पेसिफीकेशन्स जाणून घेतल्यानंतर, आता तुम्हाला आकर्षक ऑफरसह कमी किमतीत ते खरेदी करण्याचे संपूर्ण तपशील जाणून घ्या.

सर्वप्रथम, CARS24 बद्दल बोलूया, जिथे या Hyundai i10 चे २०१० चे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत १,८८,७९९ रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये गॅरंटी, वॉरंटी आणि शून्य डाउन पेमेंट कर्ज दिले जात आहे.

आणखी वाचा : जर तुम्ही Electric Bike किंवा Scooter घेण्याचा विचार करत असाल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा

DROOM वेबसाइटने Hyundai i10 चे २०१० चे मॉडेल १,३९,८७० रुपये किमतीत विक्रीसाठी पोस्ट केले आहे, ज्यावर कंपनीकडून कर्जाची सुविधा देखील दिली जात आहे.

OLX वेबसाइटवर प्रमाणित युजरने Hyundai i10 च्या २०१० चे मॉडेल पोस्ट केले आहे, ज्याची किंमत १,९५,००० रुपये आहे. या तीन ऑफर्स आणि कारचे संपूर्ण डिटेल्स वाचल्यानंतर तुम्ही तुमची गरज आणि बजेट लक्षात घेऊन ही कार कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand hyundai i10 in 1 to 2 lakh budget with guarantee with warranty plan read details prp

First published on: 31-01-2022 at 20:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×