scorecardresearch

स्पिनी आता विद्यमान बाजारपेठांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करणार; ‘स्पिनी’चे संस्थापक म्हणाले…’

वापरलेल्या कार्सची खरेदी आणि विक्री करणाऱ्या ‘स्पिनी’ हा अग्रगण्य ‘फुल स्टॅक प्लॅटफॉर्म विद्यमान बाजारपेठांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा विचारात आहे.

स्पिनी आता विद्यमान बाजारपेठांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करणार; ‘स्पिनी’चे संस्थापक म्हणाले…’
स्पिनीने विद्यमान बाजारपेठेतील स्थान आणखी मजबूत करण्याचा विचार केलाय.(Photo-financialexpress)

सचिन तेंडुलकरची स्पिनीची जाहिरात तुम्ही पाहिलेली असेलच. वापरलेल्या कार्सची खरेदी आणि विक्री करणाऱ्या ‘स्पिनी’ हा देशातील अग्रगण्य ‘फुल स्टॅक प्लॅटफॉर्म’ सध्या देशभरातील २२ टियर-वन आणि टियर-टू शहरांमध्ये आहे. अनेक नवीन शहरांमध्ये प्रवेश करण्याऐवजी स्पिनी आता विद्यमान बाजारपेठांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

स्पिनी पार्कचे विस्तार होणार

कंपनीकडे ५५ स्पिनी हब आणि एक स्पिनी पार्क आहे, जे नुकतेच बेंगळुरूमध्ये उघडण्यात आले. स्पिनी हबमध्ये जवळपास २०० कारची पार्किंग क्षमता आहे. एका स्पिनी पार्कमध्ये जवळपास एक हजार गाड्या बसू शकतात. “पुढील अडीच वर्षांमध्ये, १५ हून अधिक स्पिनी पार्क असतील आणि स्पिनी हब सध्याच्या ५५ सुविधांवरून १२० पर्यंत वाढतील, असे  ‘स्पिनी’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंग यांनी सांगितले.

(आणखी वाचा : Second Hand Car Market: सेकेंड हँड कार खरेदी करताय? मार्केटमध्ये ‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी; फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत दमदार)

Crisil आणि OLX Autos ने गेल्या वर्षी केलेल्या संयुक्त अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतीय पूर्व-मालकीच्या कार बाजार FY26 पर्यंत ७ दशलक्ष वाहनांच्या आकारात पोहोचेल. दिल्ली-एनसीआर आणि बेंगळुरू येथून स्पिनीने सर्वाधिक व्हॉल्यूम पाहिले आहेत. हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये जोरदार मागणी आहे. कंपनीच्या Q3 अहवालानुसार, मारुती, ह्युंदाई आणि होंडा हे सर्वाधिक पसंतीचे ब्रँड आहेत. स्पिनी ग्राहकाने सरासरी ५.७० लाख रुपये खर्च केले आहेत, तर एंट्री-लेव्हल कारसाठी ती २ लाख ते २.५० लाख रुपये आहे.

पुढील नऊ महिन्यांत आणखी दोन किंवा तीन शहरे जोडू शकतो, परंतु किमान पुढील एक वर्ष, आम्हाला आमच्या विद्यमान शहरांमध्ये आणखी खोलवर जायचे आहे. नजीकच्या भविष्यात आम्ही खूप नवीन शहरे जोडणार नाही, असेही सिंग म्हणाले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:57 IST

संबंधित बातम्या