Find Stolen Car: लाखो रुपये खर्च करून कार खरेदी केल्यानंतर ती जर चोरीला गेली तर काय करायचे? आज अनेक ठिकाणी वाहन चोरीला गेल्याच्या घटना कानावर येतात आणि आपल्याही मनात भीती डोकावते. तुमच्याकडे ४५ लाखांची कार असेल आणि ती चोरीला गेली तर परिस्थिती भयावह आहे. लोकांच्या गाड्या चोरीला गेल्याचे, पुन्हा सापडत नाही असे अनेकदा दिसून येते. परंतु चोरीला गेलेली कार परत मिळणे हा प्रकार फारसा पाहायला मिळत नाही. पण नुकताच असाच प्रकार अमेरिकेत घडला आहे. एका जोडप्याला त्यांची चोरी झालेली ४५ लाखांची ‘Toyota Camry’ ही कार एका उपकरणामुळे अवघ्या अडीच तासातच परत मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडले?

अमेरिकेतील मुहम्मद नावाच्या व्यक्तीची टोयोटा कॅमरी तीन चोरट्यांनी चोरली होती,  अमेरिकन जोडपे झोपले असताना चोरांनी त्यांची कार चोरून नेली. टोयोटा कॅमरीमध्ये ‘Apple AirTag’ बसवण्यात आले होते, ज्यामुळे ते कारच्या स्थानाच्या सूचना प्राप्त करण्यास सक्षम होते. डोरबेलवर लावलेल्या कॅमेऱ्याने चोरीची संपूर्ण घटना रेकॉर्ड केली. त्यांची कार चोरण्यापूर्वी चोरट्यांनी शेजारी उभी असलेली दुसरी कार चोरण्याचा प्रयत्न केल्याचे फुटेजमधून उघड झाले आहे.

हे ही वाचा << दिसायला शानदार, फीचर्सही दमदार अशी Audi Q3 Sportback देशात लाँच; पाहा किंमत

अवघ्या अडीच तासांतच लागला कारचा शोध

अॅपल उपकरणाने अवघ्या काही तासांत चोरीला गेलेल्या कारचा शोध लागला आहे. ३,४९० रुपयांच्या एअरटॅगने चोरीला गेलेली टोयोटा कॅमरी कार जप्त केली. टोयोटा कॅमरीचे मालक अंतर मुहम्मद यांनी सांगितले की, एअरटॅग त्यांना चोरीच्या कारचे स्थान देते होते आणि त्यात आम्ही झूम करून पाहिले की कार कुठे उभी आहे. पोलीस येताच एअरटॅगच्या मदतीने गाडीचे लोकेशन तात्काळ ट्रेस करण्यात यश आले. महंमद यांच्या म्हणण्यानुसार चोरीची कार अवघ्या अडीच तासांत सापडली.

AirTag कसे कार्य करते?

Toyota Camry ची भारतातील एक्स-शोरूम किंमत ४५.२५ लाख रुपये आहे. तर Apple Airtag ची किंमत ३,४९० रुपये आहे. AirTag हे एक लहान, गोल ट्रॅकिंग उपकरण आहे जे की, चाबी, बैग,आणि वाहनांना जोडलेले असते. चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या वस्तूंच्या स्थानाचा मागोवा घेण्यासाठी ते Apple चे Find My नेटवर्क वापरते. सामानाचे स्थान शोधण्यासाठी ब्लूटूथ आणि क्राउडसोर्स डेटाचा वापर केला जातो.

हे ही वाचा << इलेक्ट्रिक वाहनं ठरतील आपलं भविष्य, सचिन तेंडुलकर पडला ‘या’ महिंद्रा कारच्या प्रेमात, सांगितली मोठी गोष्ट

एअरटॅगसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान गुन्हेगारांना शिक्षा आणि कायद्याचे पालन करणाऱ्या लोकांना दिलासा देणारे आहे. कार आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी अशा उपकरणांचा वापर करून वैयक्तिक सुरक्षा मजबूत केली जाऊ शकते. या कपल कारशिवाय सामान आणि बॅगसाठीही एअरटॅगचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stolen toyota camry car was found by an american couple in just a few hours he found the car with the help of apple airtag pdb
First published on: 15-02-2023 at 09:51 IST