भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. आता Vmoto Soco ग्रुपने जगभरात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची योजना आखली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर Vmoto Fleet Concept F01 सादर केली आहे. स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर B2B सेगमेंटमध्ये एन्ट्री करेल. Vmoto कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच B2B इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत VS1 इलेक्ट्रिक स्कूटर, VS2 लाइट व्हेहिकल आणि VS3 इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Vmoto Fleet Concept F01 दिसण्यास आकर्षक आहे. ही स्कूटर वजनाने भारी असू शकते. स्कूटरच्या फिचर्सबद्दल सांगायचे तर, यात स्लीक हेडलॅम्प, U आकाराचा DRLs आणि एर्गोनॉमिकली ठेवलेले हँडलबार मिळतात. तसेच संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट असण्याची शक्यता आहे. Vmoto फ्लीट इलेक्ट्रिक स्कूटर F01 ला आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. तसेच योग्य प्रमाणात भार सहन करण्यास सक्षम आहे. Vmoto Fleet Concept F01 मध्ये 2000-वॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे त्या बॅटरीची क्षमता चांगली आहे. ही स्कूटर पूर्ण चार्जवर ९० किमीपर्यंतचं अंतर कापू शकते. तथापि, त्याचा टॉप स्पीड ४५ किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी सहा तास लागतात.

Maruti Suzuki Year-End Discounts: स्वस्तात कार! मारुती सुझुकी देत ​​आहे ४८ हजार रुपयांपर्यंत सूट; या वाहनांवर मिळणार सूट

Vmoto Soco ग्रुपने स्कूटरच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. पण संभाव्य किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते भारतात ५० हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. यावर शासनाकडून अनुदानही दिले जात आहे. याशिवाय लोक इंधनावरील वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देत ​​आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stylish fleet concept fo1 presented by vmoto soco group rmt
First published on: 09-12-2021 at 11:59 IST