गेल्या काही काळापासून कारची चांगली विक्री होत आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग चांगली कामगिरी करत आहे. अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या आहेत. यावर्षीही आतापर्यंत अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. बहुतांश कार कंपन्यांच्या विक्रीतही तेजी दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठी दिग्गज आॅटो कंपनी मारुतीच्या कारचीही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. पण यातच आता डिसेंबर कारच्या विक्रीत मारुती नव्हे तर टाटाच्या एका कारचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.  

डिसेंबर २०२३ मध्ये भारतीय कार बाजारात सुमारे २.८७ लाख युनिट्सची विक्री झाली. डिसेंबर २०२२ च्या तुलनेत विक्री ४ टक्क्यांनी वाढली परंतु नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत १४.२ टक्क्यांनी घट झाली. नेहमीप्रमाणे, मारुती सुझुकी ही सर्वात जास्त कार विकणारी कंपनी राहिली. पण, त्याचाही फटका बसला. वास्तविक, साधारणपणे दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणारी कार मारुतीची होती, तर डिसेंबर २०२३ मध्ये असे घडले नाही.

(हे ही वाचा : सुरक्षेच्या बाबतीत ‘या’ कारला तोड नाय! ६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्सवाली देशात येतेय SUV, बुकींगही सुरु )

Tata Nexon (EVs सह) डिसेंबर २०२३ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून उदयास आली आहे, एकूण विक्री १५,२८४ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे, जी दरवर्षी २७ टक्क्यांची वाढ आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एकूण १२,०५३ युनिट्सची विक्री झाली. Tata Nexon ला फक्त गेल्या वर्षाच्या शेवटी अपडेट केले गेले आहे.

सध्याच्या Tata Nexon ची किंमत ८.१० लाख ते १५.५० लाख (एक्स-शोरूम) आहे. या ५-सीटर एसयूव्हीमध्ये ७ कलर पर्याय आहेत. हे ३८२ लीटरची बूट स्पेस देते. Tata Nexon मध्ये २०८ mm ग्राउंड क्लीयरन्ससह १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे १२० PS/१७० Nm जनरेट करते. यासह, १.५-लिटर डिझेल इंजिन देखील ऑफर केले आहे, जे ११० PS/२६० Nm जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड AMT आणि ७-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) पर्याय आहेत.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात १०.२५-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, १०.२५-इंचाचा फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स आणि सबवूफरसह ९-स्पीकर JBL साउंड सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यात ३६०-डिग्री कॅमेरा देखील आहे.