सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपली स्पोर्टी डिझाइन केलेली स्टँडर्ड एडिशन Suzuki Avenis स्कूटर लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 86,500 रुपये आहे, ही स्कूटर जुन्या ट्रिमपेक्षा 200 रुपये स्वस्त आहे. याआधी सुझुकीने एवेनिस स्कूटरचे राइड कनेक्ट एडिशन आणि रेस एडिशन लॉन्च केले आहे. चला जाणून घेऊया सुझुकी एवेनिसच्या स्टँडर्ड एडिशन स्कूटरबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Suzuki Avenis स्कूटरची फिचर्स – सुझुकीने ही स्कूटर स्पोर्टी डिझाइनमध्ये डिझाइन केली आहे जी मोठ्या प्रमाणात मोटरसायकलपासून प्रेरित दिसते. Suzuki Avenis स्कूटरला Suzuki कडून ग्रॅब ग्रिल, स्पोर्टी मफलर कव्हर, अलॉय व्हील आणि बोल्ड ग्राफिक्स मिळतील. या सर्व फिचर्ससह ही स्कूटर तुम्हाला स्पोर्टी फील देईल.

Suzuki Avenis स्कूटरचे कलर ऑप्शन – या सुझुकी स्कूटरमध्ये तुम्हाला मेटॅलिक मेट फायबोरिन ग्रे, मेटॅलिक लेस ग्रीन, पर्पल ब्लेझ ऑरेंज, ग्लास स्पार्कली ब्लॅक, मेटॅलिक मॅट ब्लॅक, ग्लास स्पार्कली ब्लॅक, पर्पल मिराज व्हाइट आणि मेटॅलिक मॅट फायबोरिन ग्रे कलर असे मल्टी कलर ऑप्शन मिळतील.

आणखी वाचा : धमाकेदार ऑफर! फक्त २३ ते ३५ हजारात मिळतेय Bajaj Pulsar NS200, वाचा सविस्तर

Suzuki Avenis स्कूटर इंजिन – सुझुकीने स्टँडर्ड एडिशन Avenis स्कूटरमध्ये 125cc FI टेक्नॉलॉजी इंजिन दिले आहे जे 8.7PS पॉवर आणि 10Nm पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचे वजन 106 किलो आहे. यासोबतच या स्कूटरमध्ये इंधन भरण्यासाठी सीटच्या खाली मागील बाजूस बिजागर प्रकारची फ्यूल कॅप देण्यात आली आहे.

Suzuki Avenis स्कूटरची फिचर्स – सुझुकीच्या या स्कूटरमध्ये बाइकसारखे इंडिकेटर, बॉडी माउंट, एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प आहेत. दुसरीकडे, सुझुकी मोटरसायकल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सतोशी उचिदा म्हणाले की, सुझुकी एवेनिस ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. ते म्हणाले की, इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी यात विश्वसनीय इंजिन देण्यात आले आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suzuki avenis standard edition launched sporty design get many great features prp
First published on: 01-04-2022 at 23:30 IST