टाटा मोटर्सने आपल्या प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz ​​ची DCA ऑटोमॅटिक भारताच्या स्थानिक बाजारपेठेत लॉंच केली आहे, ज्याची घोषणा कंपनीने काही दिवसांपूर्वी केली होती. कंपनीने Tata Altroz ​​DCA ऑटोमॅटिक ही कार सात प्रकारांसह बाजारात लॉंच केली आहे आणि कंपनीने या कारसाठी २ मार्च २०२२ पासून प्री-बुकिंग सुरू केली होती.

किंमत

टाटा मोटर्सने Altroz ​​DCA ऑटोमॅटिक ही कार लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ८,०९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे. तसेच टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेली कारची किंमत ९,८९,९०० रुपये इतकी आहे.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Maruti Suzuki Raises Prices of Select Vehicles Swift and Grand Vitara Included
मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीत वाढ
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

वैशिष्ट्ये

कंपनीने Altroz ​​DCA या कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत. ज्यात सक्रिय कुलिंग तंत्रज्ञान, वेट क्लच, मशीन लर्निंग, शिफ्ट बाय वायर टेक्नॉलॉजी, सेल्फ-हीलिंग मेकॅनिझम आणि ऑटो पार्क लॉक यांचा समावेश आहे.

photo credit: PR

तसेच या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Altroz ​​मध्ये कंपनीने १.२ लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन दिले आहे जे ८६ PS पॉवर आणि १११ Nm पीक टॉर्क जनरेट करेल, तसेच हे नवीन इंजिन कंपनी कारच्या टॉप चार व्हेरिएंट XM+, XT, XZ आणि XZ+ यामध्ये उपलब्ध असेल.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हरमन साउंड सिस्टम, रिअर एसी व्हेंट्स आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच टाटा Altroz ​​DCA ऑटोमॅटिक या कारने बाजारात प्रवेश केल्यानंतर थेट हुंडई आई २० एन लाइन, मारुति बलेनो, टोयोटा ग्लैंजा, होंडा जैज, आणि फॉक्सवैगन पोलो जीटी या कारशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज असेल.

सध्याच्या टाटा अल्ट्रोज​​च्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने तीन इंजिनचे पर्याय दिले आहेत ज्यात पहिले इंजिन १.२ लिटर, दुसरे इंजिन १.२ लिटर टर्बो पेट्रोल आणि तिसरे इंजिन १.५ लिटर डिझेल इंजिन आणि ५ स्पीड मॅन्युअल आहे. या तीन इंजिनांसह ट्रान्समिशन दिले देखील दिले गेले आहे.

परंतु नवीन टाटा अल्ट्रोज ​​DCA ऑटोमॅटिक १.२-लिटरचे तीन-सिलेंडर इंजिनला जोडलेले आहे जे ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रांसमिशनशी जोडलेले गेले आहे. तसेच हे १११Nm पीक टॉर्कसह ८६ PS पॉवर जनरेट करेल.

photo credit: PR

टाटा अल्ट्रोज ​​DCA ऑटोमॅटिक ही कार ​​खरेदी करू इच्छिणारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टाटा डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात.