टाटा मोटर्सच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक म्हणजे ‘Tata Nexon’ आहे. तर टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्हीवर प्री-फेसलिफ्ट आणि फेसलिफ्ट या दोन्ही मॉडेलवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. मात्र, नेक्सॉन ईव्ही २०२४ या मॉडेलवर कोणतीही सूट नाही. ही सूट केवळ २०२३ मध्ये न विकला गेलेला स्टॉक साफ करण्यासाठी ठेवण्यात आली आहे, तर कंपनीने किमतीत कपात केल्यामुळे या गाड्यांची विक्री जोरदार होणार आहे असे दिसून येत आहे.
प्री-फेसलिफ्ट टाटा नेक्सॉन ईव्ही सूट –
नेक्सॉन ईव्ही प्री-फेसलिफ्ट मॉडेल ‘प्राइम’ आणि ‘मॅक्स’ या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. प्राइम व्हर्जन १.९० लाख ते २.३० लाख रुपयांपर्यंत सूट देते. दुसरीकडे टॉप-ऑफ-द-लाइन मॅक्स २.८० लाखांपर्यंतच्या सूटसह उपलब्ध आहे.
नेक्सॉन ईव्ही प्री-फेसलिफ्ट मॉडेल प्राइम १२७ बीएचपीच्या आउटपूटसह ३०.२ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे आणि त्याची ड्रायव्हिंग रेंज ३१२ किलोमीटर आहे. नेक्सॉन ईव्ही प्री-फेसलिफ्ट मॉडेल मॅक्स व्हेरियंट ४०.५ के डब्ल्यूएच या मोठ्या बॅटरी पॅकसह येतो आणि एका चार्जवर ४३७ किमीच्या सिंगल चार्जसह १४१ बीएचपी रेंज देतो.
हेही वाचा…Tata Motors: देशातील पहिल्या एएमटी CNG कार भारतात लाँच; किंमत अन् फीचर्स जाणून घ्या
२०२३ टाटा नेक्सॉन ईव्ही सूट –
२०२३ टाटा नेक्सॉन ईव्हीचे प्रकार द फिअरलेस एमआर, एम्पॉवर्ड प्लस एलआर आणि एम्पॉवर्ड एमआर ५०,००० रुपयांच्या डीलसह उपलब्ध आहेत. तसेच डिस्काउंट आणि बेनेफिट्ससह फिअरलेस प्लस एमआर, फिअरलेस प्लस एस इमआर आणि फिअरलेस प्लस एलआर व्हेरिएंट्स ६५,००० रुपयांपर्यंतच्या डीलसह उपलब्ध आहेत. फिअरलेस एलआर आणि फिअरलेस प्लस एस एलआर मॉडेल्सना ८५,००० आणि एक लाख रुपयांची सूट मिळणार आहे.
पोस्ट-फेसलिफ्ट नेक्सॉन ईव्ही दोन मॉडेल्समध्ये उपल्बध आहेत – एमआर आणि एलआर. यामध्ये १२७ बीएचपी आणि २१५ एनएमसह ३०.२ के डब्ल्यूएच बॅटरी पॅक मिळतो. एआरएआयच्या मते ३२५ किलोमीटर रेंज देते. एलआर व्हेरिएंट १४३ बीएचपी आणि २१५ एनएमच्या आउटपूटसह ४०.५ के डब्ल्यूएच बॅटरीद्वारे समर्थित आहे. एलआर नेक्सॉन ईव्हीची ड्रायव्हिंग रेंज एका चार्जवर ४६५ किलोमीटर प्रवास करते, तर या भरघोस डिस्काउंट असणाऱ्या टाटा मोटर्सच्या गाड्या ग्राहक खरेदी करू शकणार आहेत.