टाटा मोटर्स कंपनीने भारतीय ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने त्यांची सर्वात स्वस्त आणि सर्वात सुरक्षित एसयूव्ही टाटा पंच या कारचं एक व्हेरिएंट बंद केलं आहे. कंपनीने पंच या कारचं टॉप स्पेक काझीरंगा एडिशन त्यांच्या वेबसाईटवरून हटवलं आहे. कॅमो स्पेशल एडिशनमध्ये बी-१ सेगमेंटमध्ये ही एसयूव्ही खरेदीसाठी उपलब्ध असेल. काझीरंगा व्हेरिएंट पंच या कारचं एक क्रिएटिव्ह मॉडेल होतं. ही कार कंपनीने गेल्या वर्षी (२०२२) इंडियन प्रीमियर लीगदरम्यान क्रिकेट स्टेडियममध्ये शोकेस केली होती.

काझीरंगा एडिशनमध्ये प्रोजेक्टर हेडलाईट्स, एलईडी डीआरएल, कॉर्नरिंग फॉग लाईट्स, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलाईट्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ७.० इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉयड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, बटन इंजिन स्टार्ट-स्टॉपसारखे फीचर्स दिले होते.

Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
Pebble company launches worlds slimmest Bluetooth calling smartwatch Royale with sleek and elegant design
‘या’ कंपनीने लाँच केलं सर्वात स्लिम स्मार्टवॉच; कॅलक्युलेटरपासून ते ब्लूटूथ कॉलिंगपर्यंत असणार फीचर्स खास
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

कशी आहे टाटा पंच?

टाटा मोटर्स कंपनी पंच या कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन ऑफर करते. हे इंजिन ६००० आरपीएमवर ८६ पीएस पॉवर आणि ३३०० आरपीएमवर ११३ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. कंपनी लवकरच ही कार सीएनजी अवतारात सादर करू शकते.

हे ही वाचा >> लिलाव झाला लिलाव! ‘ही’ कार ठरली जगातील सर्वात नवीन महागडी कार

टाटा पंचची किंमत

कंपनीने या कारचं काझीरंगा एडिशन जरी बंद केलं असलं तरी या कारचं कॅमो व्हेरिएंट ब्लॅक अँड व्हाईट रूफ पर्यायात उपलब्ध असेल. तसेच यात डार्क ग्रीन एक्सटीरियर पाहायला मिळेल. यात १६ इंचांचे अलॉय व्हील्स मिळतात. टाटा पंचच्या बेस व्हेरिएंटची किंमत ५.९९ लाख रुपये इतकी आहे. ही कंपनीची देशातली सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.