बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाइक्स यांचे मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये मोठे वाढले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच आता बाजारपेठेत एका इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची तुफान मागणी दिसून आली आहे.
स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घातल्यानंतर शाओमी कंपनीने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. शाओमीची पहिली इलेक्ट्रीक कार बाजारात दाखल झाली आहे. नुकतेच Xiaomi च्या इलेक्ट्रिक कारने बाजारपेठेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे, Xiaomi ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार Xiaomi SUV7 लाँच केली आहे. कंपनीने लाँच केल्याच्या अवघ्या २४ तासांच्या आत त्याच्या नवीन SU7 मॉडेलसाठी ८८,८९८ बुकींग मिळाल्या आहेत. या कारच्या बुकिंगसाठी, ग्राहकांना ५,००० युआन (सुमारे ८५० USD) ची ठेव भरावी लागेल. Xiaomi SU7 ची निर्मिती सरकारी मालकीच्या बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी (BAIC) द्वारे केली जात आहे, जी मर्सिडीज-बेंझमधील प्रमुख भागधारक देखील आहे. Xiaomi एप्रिलच्या अखेरीस कारची डिलिव्हरी सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.
(हे ही वाचा : Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…)
Xiaomi SU7 ची सुरुवातीची किंमत २१५,९०० युआन (सुमारे २५.३४ लाख रुपये) ठेवण्यात आली आहे, त्यामुळे Tesla Model 3 पेक्षा ३०,००० युआन (सुमारे ३.४६ लाख रुपये) कमी असल्याने हा एक ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय देखील ठरला आहे. हाय-स्पेक SU7 मध्ये ऑल-व्हील ड्राईव्ह, ड्युअल मोटर्स आणि ६६३ hp क्षमतेचा शक्तिशाली ४९५kW बॅटरी पॅक आहे. १०१kWh ची बॅटरी एका चार्जमध्ये ८०० किमीची रेंज देते. Xiaomi SU7 इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये स्मार्टफोन प्रमाणे फेस रेकग्निशन लॉक/अनलॉक सिस्टीम देण्यात आली आहे.
शाओमीच्या या कारमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीला जास्त महत्व दिले गेले आहे. Xiaomi SU7 कार ही ४९९७ मिमी लांब, १,९६३ मिमी रुंद आणि १४५५ मिमी उंच आहे. ही कार लवकरच भारतात लाँच होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.