scorecardresearch

‘या’ मारुती कारसमोर क्रेटा पडली फिकी, एकदा विकत घेतल्यास १५ वर्षांपर्यंत राहा टेन्शन फ्री! किंमत १२.५० लाख

Maruti Suzuki Car: कार चालवा अन् दिर्घकाळ टिकवा…

Maruti Suzuki Grand Vitara
मारुतीची 'ही' कार एकदा विकत घ्या अन् राहा टेन्शन फ्री (Photo-financialexpress)

Best Car Under 15 Lakh: घर खरेदी प्रमाणेच कार घेणे ही देखील सामान्य माणसाच्या आयुष्यात मोठी गोष्ट आहे. व्यक्ती आपल्या कष्टाची कमाई गाडीवर खर्च करते. मग अशी कार खरेदी करा जी कार खरेदी करुन वर्षानुवर्ष तिच्याकडे पाहावेही लागणार नाही. म्हणूनच सर्व जबरदस्त वैशिष्ट्ये असलेली कार खरेदी करणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही ती १५ वर्षे आरामात चालवू शकता. आज आपण अशाच कारबद्दल बोलणार आहोत जी पूर्णपणे सर्वगुणसंपन्न कार आहे.

मारुती ग्रँड विटारा, गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत लाँच झालेली ही अशी कार आहे, ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही कार खरेदीदारांच्या मापदंडांवर अवलंबून आहे. ग्रँडमधील व्हिटारामध्ये चांगली जागा, चांगली रचना, उच्च ग्राउंड क्लिअरन्स, शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळे ग्रँड विटारा या सेगमेंटमधील इतर वाहनांना टक्कर देत आहे. ही कार दीर्घकाळ टिकू शकते.

(हे ही वाचा : स्वप्न करा पूर्ण! मारुतीची CNG कार स्कूटीपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा, मायलेज ३१ किमी )

रंग आणि डिझाइन

मारुती सुझुकी ग्रँड विटारा ९ वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात ओपुलेंट रेड, नेक्सा ब्लू, आर्कटिक व्हाइट, स्प्लेंडिड सिल्वर, ग्रैंडर ग्रे, चेस्टनट ब्राउन, ब्लैक रूफ, आर्कटिक व्हाइट, ब्लैक रूफ, स्प्लेंडिड सिल्वर आणि ब्लैक रूफ सहित ओपुलेंट रेड, अशा रंगाचा समावेश आहे.  बाहेरून, ग्रँड विटाराला स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, नवीन १६-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, कॉन्ट्रास्ट-रंगीत स्किड प्लेट्स, रॅपराऊंड एलईडी टेललाइट्स, शार्क-फिन अँटेना, सर्वत्र प्लास्टिक क्लेडिंग आणि उच्च माउंट केलेले स्टॉप दिवे मिळतात. यासह, इंटिग्रेटेड स्पॉयलरसारखे डिझाइन घटक आढळतात.

किंमत

मारुती सुझुकी ग्रँड विटारा गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी भारतात लाँच झाली होती. ग्रँड विटाराची ऑन-रोड किंमत १२.५० लाखांपासून सुरू होते आणि आॅन रोड २३ लाखांपर्यंत जाते. ग्रँड विटारा सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा+ आणि अल्फा+ या सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ग्रँड व्हिटारामध्ये ५ लोकांसाठी पुरेशी जागा आहे. ग्रँड विटारा किआ सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, एमजी एस्टर, टाटा हॅरियर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टिगुन यांच्याशी स्पर्धा करते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:42 IST