भारतात सध्या सगळीकडे सणासुदीची खरेदी विक्री सुरू आहे. अशावेळी अनेक ऑनलाईन साईट्स देखील विविध ऑफर सादर करत आहे. याचवेळी देशातील टॉप दुचाकी निर्माता कंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया खास ऑफर देत आहे. होंडा शून्य टक्के ईएमआय झिरो डाऊन पेमेंट आणि बाईक आणि चर्चा खरेदीवर कॅशबॅक ऑफर करत आहे.

होंडाची स्पेशल ऑफर

या फेस्टिव्ह सीजन मध्ये होंडा आपल्या दुचाकी आणि स्कूटर च्या खरेदीवर ५ टक्के कॅश ऑफर करत आहे. ही ऑफर ५ हजार रुपयांपर्यंत असू शकते. याच बरोबर फायनान्सवर कंपनीची वाहने खरेदी करणाऱ्यांना कंपनी झिरो डाउन पेमेंट ऑफर देत आहे.

तसेच या ऑफर अंतर्गत कस्टमरला नो कॉस्ट ईएमआय देखील दिला जात आहे. त्यासोबत या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी काही अटी सुद्धा कंपनीकडून लागू करण्यात आले आहेत. कॅशबॅक ऑफर साठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टॅंडर्ड चार्टर्ड, वन कार्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा या बँकेची कार्ड्स वापरू शकतात.

आणखी वाचा : Citroen ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात करणार धमाकेदार एंट्री; जाणून कशी असेल ही कार…

हिरोची स्पेशल ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरोदेखील या फेस्टिव्ह सीजन मध्ये एक्सचेंज ऑफर म्हणून ५,००० रू पर्यंतचा डिकाउंट देत आहे. याबरोबरच आपल्या कस्टमरला एका वर्षासाठी इन्शुरेंस बेनिफिट्, दोन वर्षांसाठी फ्री मेंटेनेंससह ५ वर्षांची वॉरंटी आणि ६ महिन्यांसाठी शून्य टक्के ईएमआय  देत आहे.