Upcoming 7-Seater SUV: देशातील बाजारपेठेत महिंद्रा अँड महिंद्राचा दबदबा पाहायला मिळतो. महिंद्राच्या कार्स भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. भारतीय बाजारात महिंद्राची सर्वात नवीन Mahindra XUV700 ला ग्राहकांकडून खूप पसंत केले जात आहे. ही कंपनीची बेस्ट सेलिंग एसयूव्ही आहे. आतापर्यंत या गाडीच्या १ लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. भारतासह जगभरात महिंद्राच्या गाड्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. पण आता भारतीय वाहन बाजारात तीन नवीन सात सीटर कार एसयूव्ही लवकरच सादर होणार आहेत, त्यामुळे Mahindra XUV700 चा खेळ संपू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय बाजारात ‘या’ तीन कार दाखल होणार

Tata Safari 

टाटा मोटर्स १७ ऑक्टोबर रोजी त्यांचे नवीन टाटा सफारी फेसलिफ्ट लाँच करणार आहे. भारतीय कार उत्पादक कंपनीने काही दिवसांपूर्वीच नवीन कारचे अनावरण केले होते. या कारसाठी नुकतेच बुकिंग सुरू झाले आहे. खरेदीदार नवीन टाटा सफारी फेसलिफ्टसाठी २५,००० रुपयांची टोकन किंमत देऊन ऑर्डर देऊ शकतात. या महिन्याच्या अखेरीस या नवीन कारची डिलिव्हरी होण्याची अपेक्षा आहे.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, इटालियन कंपनीने भारतात दाखल केली नवी ऑफ-रोड बाईक, किंमत… )

Toyota Corolla Cross SUV

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी भारतीय बाजारात आपली नवीन मिडसाइज ७ सीटर एसयूव्ही आणण्याच्या तयारित आहे.  या एसयूव्हीची लांबी ४.५ मीटरहून जास्त असू शकते. तसेच व्हीलबेस ३००० एमएमचे असू शकते. या एसयूव्हीमध्ये फ्लेक्सिबल सीट्स असतील. या एसयूव्हीमध्ये २.० लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सोबत २.० लीटर पेट्रोल इंजिन पाहायला मिळू शकते. जे १८६bhp आणि १७२bhp पर्यंत पॉवर जनरेट करते. लूक आणि फीचर्समध्ये ही कार खास असणार असे बोलले जात आहे.

Maruti Grand Vitara SUV

मारुती सुझुकी ग्रँड विटारावर आधारित 7-सीटर एसयूव्ही विकसित करण्यावर काम करत आहे. या कारला सध्या विटारा मॉडलच्या प्लॅटफॉर्मवर बनवले जाणार आहे. एसयूव्हीच्या डिझाइन मध्ये काही किरकोळ बदल केले जाऊ शकते. ग्रँड विटाराचे ७ सीटर मॉडल सुद्धा हायब्रिड टेक्नोलॉजीचे इंजिन सोबत येऊ शकते. या कारमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबत एसयूव्हीचे मायलेज २८ kmpl पर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कारची किंमत २० लाख ते ३० लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.

Story img Loader