scorecardresearch

Tiger Sport 660 बाइक भारतात लाँच, Kawasaki Versys 650 आणि Suzuki V Strom 650 XT शी असेल स्पर्धा

ट्रायम्फ मोटरसायकलने लाँच केलेल्या प्रिमियम बाइक सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन बाइकची भर पडली आहे. कंपनीने या प्रीमियम बाईकला Tiger Sport 660 असे नाव दिले आहे.

Tiger-Sport-660
Tiger Sport 660 बाइक भारतात लाँच, Kawasaki Versys 650 आणि Suzuki V Strom 650 XT शी असेल स्पर्धा (फोटो- TRIUMPH)

ट्रायम्फ मोटरसायकलने लाँच केलेल्या प्रिमियम बाइक सेगमेंटमध्ये आणखी एक नवीन बाइकची भर पडली आहे. कंपनीने या प्रीमियम बाईकला Tiger Sport 660 असे नाव दिले आहे. या गाडीची किंमत ८.९५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. भारतात लाँच करण्यापूर्वीच कंपनीने डिसेंबर २०२१ पासूनच या प्रीमियम बाइकचे प्री-बुकिंग सुरू केले होते. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ही बाइक बुक करू शकता. ही बाइक बुक करण्यासाठी कंपनीने ५० हजार रुपयांची टोकन रक्कम निश्चित केली आहे. ही रक्कम तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरू शकता. कंपनी लवकरच या बाइकची डिलिव्हरी सुरू करणार आहे. तुम्हालाही प्रीमियम बाइक्स आवडत असतील आणि तुम्हाला खरेदी करायची असेल, तर या बाइकची रचना, वैशिष्ट्ये, इंजिन आणि पॉवर यासह प्रत्येक तपशील जाणून घ्या.

Tiger Sport 660 ही एक प्रीमियम अ‍ॅडव्हेंचर बाइक आहे. कंपनीच्या विद्यमान ट्रायडेंट 660 नेकेड स्ट्रीट फायटर बाइकवर आधारित आहे. कंपनीने या बाइकमध्ये ट्विन शार्प एलईडी हेडलॅम्पसह राईड-बाय-वायर तंत्रज्ञान वापरले आहे. तसेच बाइकमध्ये दोन रायडिंग मोड देण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिला मोड रेन आणि दुसरा मोड रोड आहे. बाइकमध्ये मोबाईल अ‍ॅप आधारित माय ट्रायम्फ कनेक्टिव्हिटी सिस्टमद्वारे कनेक्ट केले जाऊ शकते. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ३ सिलेंडरसह ६६० सीसी इंजिन दिले आहे जे लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८० एचपी पॉवर आणि ६४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ६ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

१ एप्रिलपासून कार खरेदी करणं पडेल महागात, कोणत्या गाड्यांचे भाव वाढणार? जाणून घ्या

बाइकमध्ये स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यासारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक तीन आकर्षक रंगसंगतींसह सादर केली आहे, लर्सन ब्लू, कोरोसी रेड आणि ब्लॅक कलर टोन आहे. कंपनी या प्रीमियम अ‍ॅडव्हेंचर बाइकवर दोन वर्षांची किंवा अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी देत ​​आहे. अ‍ॅडव्हेंचर बाइक सेगमेंटमध्ये लाँच केल्यानंतर ही बाइक या सेगमेंटमधील लोकप्रिय Kawasaki Versys 650 आणि Suzuki V-Strom 650 XT सारख्या प्रीमियम बाइकशी थेट स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger sport 660 bike launched in india rmt

ताज्या बातम्या